मेकअप करायला आवडतं पण कोणते प्रोडक्ट्स वापरावे याबाबत गोंधळ होतो? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप माहिती

ऑफिसमध्ये असो की बाहेर कुठे अन्य ठिकाणी जाताना आपण चारचौघात उठून दिसावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी आपण त्वचेची काळजी घेतो. तसेच मेकअप करून सौंदर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. ज्यांना याची आवड आणि सवय आहे त्यांना मेकअपसाठी कोणते प्रोडक्ट कधी, कसे आणि कुठे वापरावे याची चांगली माहिती असते.
मेकअप करायला आवडतं पण कोणते प्रोडक्ट्स वापरावे याबाबत गोंधळ होतो? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप माहिती
Freepik
Published on

ऑफिसमध्ये असो की बाहेर कुठे अन्य ठिकाणी जाताना आपण चारचौघात उठून दिसावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी आपण त्वचेची काळजी घेतो. तसेच मेकअप करून सौंदर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. ज्यांना याची आवड आणि सवय आहे त्यांना मेकअपसाठी कोणते प्रोडक्ट कधी, कसे आणि कुठे वापरावे याची चांगली माहिती असते. मात्र, ज्यांना याबाबत अधिक माहिती नाही पण ज्यांना मेकअप करायचा आहे त्यांच्यासाठी इथे आहे स्टेप बाय स्टेप माहिती...

तुम्हाला सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी मेकअप करायचा आहे? त्यासाठी तुमच्याकडे खूप जास्त मेकअप प्रोडक्ट्स असण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मोजक्या पाच प्रोडक्ट्सद्वारे स्वतःला लूक एकदम फ्रेश, सुंदर आणि आकर्षक करू शकता. तसेच हे प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या छोट्याशा पर्समध्येसुद्धा कॅरी करू शकता.

BB क्रीम

BB अर्थात blemish balm हा मेकअप करण्याच्या सर्वात आधी लावायचा असतो. हा फाउंडेशन, प्राइमर आणि मॉइश्चरायझर अशा तिन्हींचे कार्य एकत्रितपणे करतो. यामुळे तुमच्या मेकअपचा बेस तयार होतो. तसेच त्वचेवरील बारीक डाग यामुळे लपवता येतात. यामुळे चेहऱ्यावर एकसमांतर मेकअप करता येतो. याला लावणे खूप सोपे असते. तुम्ही तुमच्या बोटांनी संपूर्ण चेहऱ्यावर समांतर पद्धतीने ही क्रीम लावू शकता किंवा ब्रश किंवा ब्यूटी ब्लेंडरने ब्लेंड करून याचा उपयोग करू शकता.

कन्सीलर

बीबी क्रिम लावल्यानंतर पुढील मेकअप करण्याआधी तुमच्या चेहऱ्यावर जर डार्क सर्कल, पिंपल्स किंवा दाग असतील तर ते कन्सीलरने लपवून घ्या. विशेष करून डोळ्यांखाली तसेच नाकाजवळ असलेले डाग यामुळे लपवता येतात. बाजारात तुमच्या त्वचेच्या रंगानुसार कन्सीलर उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या त्वचेला सूट करणारा कंन्सीलर घेऊ शकतात.

काजळ, आयलायनर आणि मस्कारा

डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तसेच ते रेखीव दिसण्यासाठी काजळचा उपयोग करा. तसेच तुम्ही काजळ पेन्सीलचा उपयोग आयलायनरसाठी देखील करू शकता. तुम्ही किंवा लिक्विड आयलायनर वेगळा वापरू शकता. यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे काजळ आणि आयलायनर मिळतात. तुम्ही तुमच्या चेहरा आणि ड्रेसिंग स्टाईलनुसार रंगाची निवड करू शकता. याशिवाय डोळे मोठे आणि सुंदर दिसण्यासाठी पापण्यांना मस्कारा लावा. यामुळे डोळे अधिक सुंदर दिसतात.

लिपस्टिक

ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी लिपस्टिकचा उपयोग करा. ओठांवर लिपस्टिक वापरल्याने गाल आणि चेहऱ्याचा अन्य भाग देखील चमकदार दिसतो. लिपस्टिक लावताना ती व्यवस्थित तुमच्या ओठांचा आकार स्पष्टपणे दिसेल, अशा प्रकारे लावा.

ब्लश

ब्लशमुळे गालांचे सौंदर्य खुलून दिसते. ब्लश अनेक वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असते. तुम्ही तुमच्या चेहऱ्याला काय छान दिसते यावर कोणत्या रंगाचे ब्लश लावायचे, हे ठरवा.

logo
marathi.freepressjournal.in