
सौंदर्यशास्त्रात सुरेख Eyebrow ला खूप महत्त्व आहे. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य उठून दिसते. कपाळावरील आखीव रेखीव भुवयांमुळे तुमच्या व्यक्तीमत्वाला नवी उंची प्राप्त होते. Eyebrow च्या वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत. छोट्या एकदम बारीक सरळ रेषेतील Eyebrow, मध्ये त्रिकोणी उंचवटा घेऊन डोंगराप्रमाणे ठेवलेल्या Eyebrow, अर्धचंद्राकृती Eyebrow, दोन्ही भुवया मिक्स होणाऱ्या जाडसर Eyebrow, अशा वेगेवगेळ्या स्टाईलमध्ये थ्रेडिंगद्वारे Eyebrow करता येतात. तसेच आजच्या काळात अन्य अनेक उपकरणे Eyebrow ला शेप देण्यासाठी बाजारात उपलब्ध आहेत. जाणून घ्या तुमच्या चेहऱ्याला नेमक्या कोणत्या प्रकारच्या Eyebrow छान दिसतील.
अंडाकार चेहरा
तुमचा चेहरा जर अंडाकार आकाराचा असेल तर अशा चेहऱ्यावर लहान आणि थोड्या जाडसर Eyebrow छान दिसतात. यामुळे चेहरा सुंदर दिसतो.
लहान कपाळ
काहींचे कपाळ खूप लहान असते. अशावेळी बारीक आणि अर्धचंद्राकार किंवा सरळ रेषेत फक्त पुढच्या बाजूला वळणदार आकार दिलेल्या Eyebrow सुंदर दिसतात. यामुळे त्यांचे कपाळ उठून दिसते. ज्यांचे कपाळ लहान आहे त्यांना खूप जाड भुवया चांगल्या दिसत नाहीत. यामुळे त्यांचा चेहरा जास्त मोठा वाटतो. त्यामुळे ज्यांचे कपाळ लहान आहे त्यांनी Eyebrow ला बारीक आणि अर्धचंद्राकार आकार द्यावा.
मोठे कपाळ
ज्यांचे कपाळ मोठे आहे. त्यांना सरळ रेषेत जाडसर भुवया तसेच एकमेकांमध्ये मिक्स होणारी Eyebrow स्टाईल छान दिसते. यामुळे त्यांचे मोठे कपाळ थोडे छोटे दिसू लागते. मात्र, कपाळ मोठे असेल आणि नाक बसके असेल तर त्यांनी आपआपसात मिक्स होणारी स्टाईल ठेवू नये. त्यांनी दोन्ही भुवयांमध्ये समांतर गॅप ठेवावा.
गोल चेहरा
ज्यांचा चेहरा गोल आहे. त्यांना अर्धचंद्राकार आकाराच्या Eyebrow सूट करतात. यामुळे त्यांच्या चेहऱ्याला वेगळा उठाव दिसतो.
लंबवर्तुळाकार पातळ चेहरा
ज्यांचा चेहरा लंबवर्तुळाकार आहे. नाक एकदम सरळ आहे आणि कपाळ मध्यम आकाराचे आहे. त्यांना भुवयांना मधोमध उंच पॉइंट काढून बाकी दोन्हीकडे उतरत्या अशा पर्वताच्या आकाराच्या Eyebrow छान दिसतात. यामुळे त्यांचा चेहरा अधिक सुंदर दिसतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)