Monsoon Care: मान्सूनमध्ये 'या' आजारांपासून रहा सावधान! जाणून घ्या लक्षणं

Monsoon Disease: हा ऋतू आपल्यासोबत आनंद घेऊन येतो हे खरे असले तरीही याच काळात ट्रॅफिकमुळे होणारा उशीर, रस्तोरस्ती साचलेले पाणी आणि मोसमी आजारांसारखी अनेक आव्हानेही सामोरी येतात.
Monsoon Care: मान्सूनमध्ये 'या' आजारांपासून रहा सावधान! जाणून घ्या लक्षणं
Published on

Health Care: मान्सून आला की सूर्याच्या उष्ण झळांपासून सुटका आणि हवाहवासा दिलासा मिळतो. गरमागरम चहाच्या सोबतीने भज्यांवर ताव मारण्याचा, लाँग ड्राइव्हवर जाण्याचा हा काळ. हा ऋतू आपल्यासोबत आनंद घेऊन येतो हे खरे असले तरीही याच काळात ट्रॅफिकमुळे होणारा उशीर, रस्तोरस्ती साचलेले पाणी आणि मोसमी आजारांसारखी अनेक आव्हानेही सामोरी येतात. पोट व आतड्याशी संबंधित आणि माध्यमांद्वारे संक्रमित होणाऱ्या सर्दी आणि फ्लूसारख्या आजारांचे प्रमाण पावसाळ्यामध्ये वाढते. या काळामध्ये आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

नवी मुंबई येथील मोरलवार चाइल्ड केअर हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट पीडिअॅट्रिशियन डॉ. सदानंद शेट्ये म्हणाले, “पावसाळ्यामध्ये ताप, घसा बसणे, पोटात कळा येणे किंवा अशाच प्रकारची विविध लक्षणे किंवा इतर आरोग्यविषयक तक्रारी घेऊन आमच्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये सर्वसाधारणपणे ६० टक्‍के वाढ होते. या ऋतूमध्ये सर्वत्रच अशी आजारपणं दिसून येतात हे लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि वेळच्यावेळी निदान करून घेणे ही आपले स्वास्थ्य सक्रियपणे सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

अबॉट इंडियाचे मेडिकल अफेअर्स डिरेक्टर डॉ. जेजो करनकुमार पुढे सांगतात, “पावसाळा म्हणजे काही आरोग्य समस्यांमध्ये वाढ होण्याचा काळ असतो आणि म्हणूनच या आजारांचे धोके, खबरदारीचे उपाय आणि आपले स्वास्थ्य अधिक चांगल्या प्रकारे कसे जपावे याविषयीची माहिती लोकांना मिळावी यासाठी त्यांची मदत करणे आवश्यक ठरते. वेळच्यावेळी केलेले निदान आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचार व पथ्यपाण्याचे काटकोरपणे पालन केल्याने रोगप्रतिकाशक्ती वाढण्यास मदत होईल आणि तुम्ही मान्सूनचा आनंद अनुभवताना निरोगीही राहू शकाल.”

Monsoon Care: मान्सूनमध्ये 'या' आजारांपासून रहा सावधान! जाणून घ्या लक्षणं
Hepatitis B & C: वाढतोय 'हेपेटाइटिस बी आणि सी' हा आजार, कसा होतो संसर्ग? जाणून घ्या

या ऋतूमध्ये सर्वत्र आढळून येणाऱ्या पुढील ५ आरोग्य समस्यांवर लक्ष ठेवा:

> सर्दी आणि फ्लू

तापमानात अचानक झालेले बदल आणि हवामानामध्ये वाढलेला दमटपणा यांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते व त्यामुळे विषाणूजन्य संसर्ग सहजपणे फैलावू शकतात. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशांमध्ये या काळामध्ये फ्लू (किंवा इन्फ्लुएन्झा)ची प्रकरणे पुन्हा-पुन्हा वाढताना दिसतात. घसा बसणे, ताप, सांधे किंवा स्नायू दुखणे, डोकेदुखी, मळमळणे किंवा डायरिया अशा समस्यांचा या आजाराच्या लक्षणांमध्ये समावेश होतो. इतर आजारांमध्येही अशाच प्रकारची लक्षणे दिसू शकतात, मात्र साध्या सर्दीच्या तुलनेत फ्लूचा शरीरावर होणारा परिणाम अधिक गंभीर असतो आणि म्हणूनच या आजाराची लक्षणे लवकरात लवकर ओळखणे गरजेचे आहे.

> फंगल इन्फेक्शन

ओल असलेल्या, दमट ठिकाणी फंगल अर्थात बुरशीजन्य संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असते. यामुळे अॅथलिट्स फूट, रिंगवर्म आणि यीस्ट इन्फेक्शन्स सारखे जंतूसंसर्ग होऊ शकतात. खाज येणे, त्वचा लाल होणे किंवा सूजणे ही या संसर्गाची सर्वसाधारणपणे आढळून येणारी लक्षणे आहेत.

Monsoon Care: मान्सूनमध्ये 'या' आजारांपासून रहा सावधान! जाणून घ्या लक्षणं
Monsoon Health Tips: पावसाळ्यात उत्तम आरोग्यासाठी काय खावे आणि काय टाळावे?

> पोटाच्या समस्या

दूषित पाणी आणि बाहेरचे अन्न खाल्ल्याने डायरिया आणि फूड पॉयझनिंगसारखे गॅस्ट्रोइंटेस्टिनल अर्थात पोट व आतड्याचे आजार होऊ शकतात. पोटात दुखणे, मुरडा मारणे, मळमळणे इत्यादी लक्षणे यात दिसून येतात.

Monsoon Care: मान्सूनमध्ये 'या' आजारांपासून रहा सावधान! जाणून घ्या लक्षणं
Health Care: मलेरिया की डेंग्यू, ताप कशामुळे आला हे कसे ओळखावे? जाणून घ्या तज्ञांकडून

> मलेरिया आणि डेन्ग्यू

मान्सूनमध्ये साचलेल्या पाण्यामुळे माध्यमांवाटे संक्रमित होणाऱ्या आजारांच्या जीवजंतूंच्या पैदाशीला मोकळे रान मिळते. खरेतर जगभरातील मलेरियाच्या रुग्णांपैकी ११ टक्‍के रुग्ण आणि डेन्ग्यूच्या रुग्णांपैकी ३४ टक्‍के रुग्ण एकट्या भारतात आढळतात. ताप, हुडहुडी भरणे आणि घाम येणे ही मलेरियाची प्रमुख लक्षणे आहेत. डेन्ग्यूमध्ये खूप ताप, गंभीर डोकेदुखी, डोळ्यांमागे दुखणे, स्नायू दुखणे आणि शरीरावर चट्टे येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in