
अनेक जणांना जेवणानंतर पोट फुगण्याची (bloating problem) समस्या जाणवते. अर्थात जेवणाच्या काही तासानंतर ही समस्या सुटते. मात्र, तुम्हाला जर नेहमीच जेवण केल्यानंतर पोट फुगत असेल. तर ते गांभीर्याने घ्यायला हवे. ही समस्या सामान्यपणे पचनाशी निगडीत असते. अन्न योग्य पचन होत नसल्याने ही समस्या निर्माण होते. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यास आतड्यांना सूज येण्यासारखे गंभीर आजार संभवतात. पोट फुगण्यासाठी अनेक कारणे असतात. त्यातील काही महत्त्वाची कारणे खालील प्रमाणे
जेवण्याची चुकीची पद्धत (bloating problem)
जेवण्याची चुकीची पद्धत ही जेवल्यानंतर पोट फुगण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. अनेक वेळा जेवण आवडले किंवा आवडीचे पदार्थ असेल तर भूक नसतानाही आपण खातो. आयुर्वेदानुसार अन्नाचे उत्तम पचन होण्यासाठी तुमच्या पोटात जेव्हा कडक भूक लागेल तेव्हाच जेवायचे असते. मात्र, हल्ली असे होत नाही. सातत्याने काही ना काही खात राहिल्यामुळे पचनशक्तीवर विपरित परिणाम होतात. किंवा काही जण जेवताना खूप घाईघाईत अन्न न चावता भराभर जेवण करतात. यामुळे पोट जड झाल्यासारखे वाटते. तसेच पोट फुगते.
आतड्यात अतिरिक्त गॅस तयार होणे (bloating problem)
आपण काहीही खाल्ल्यानंतर त्याचे लगेचच पाचन सुरू व्हायला हवे. मात्र, तसे न झाल्यास आतड्यात अतिरिक्त गॅसची निर्मिती होते. परिणामी जेवणानंतर पोट फुगल्यासारखे वाटते.
असंवेदनशील आतडे (bloating problem)
काही लोकांचे आतडे हे असंवेदनशील असते. तसेच खाल्लेले अन्न पचन होत नाही. त्यामुळे कमी खाल्ले तरी पोटात गॅस तयार होतो. परिणामी पोट फुगते.
जेवताना पाणी पिण्याची सवय(bloating problem)
जेवताना पाणी पिण्याची चुकीची सवय असते. यामुळे अन्न पचनाची क्रिया मंदावते. अन्न पचन न झाल्यास पोटात दुखणे, गॅस होणे, बद्धकोष्ठता, असे प्रकार होतात.
काय उपाय करावे? solution for bloating problem
जीवनशैलीतील छोटे छोटे बदल करून तुम्ही ही पोटफुगीची समस्या कायमची दूर करू शकता.
भूक असेल तेवढेच जेवणे
पोटात जेवढी भूक आहे. त्यापेक्षा थोडे कमी जेवणे हे आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले गेले आहे. यामुळे अन्नाचे पाचन व्यवस्थितरित्या होते.
जेवताना पाणी पिणे टाळा (bloating problem)
जेवताना शक्यतो पाणी पिऊ नका. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. अगदीच एखादे वेळेस ठसका लागला तरच पाणी प्यावे.
अन्न चावून चावून खा
जेवण करताना कधीही शांत मनाने करावे. अन्नाचा एक एक घास हळूहळू चावून चावून खाणे योग्य असते. यामुळे अन्नरस व्यवस्थित तयार होतो आणि पचनक्रिया सुरळीत पार पडते.
सोडियमयुक्त अन्न टाळा, पोटॅशियमयुक्त अन्न खा
पोटफुगीसाठी अन्नात सोडियम असेलेले पदार्थ शक्यतो टाळावे. यामध्ये बाहेरचे पिझ्झा, बर्गर, वडापाव इत्यादी आहाराचा समावेश होतो. तसेच आहारात मीठाचे प्रमाण कमी करावे. पोटॅशियमयुक्त अन्नाचा आहारात जास्तीत जास्त समावेश करणे उत्तम आहे.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)