ताक हे आरोग्याला उत्तमच पण योग्य वेळी पिणे महत्त्वाचे, जाणून घ्या कधी प्यावे आणि कधी पिऊ नये

ताक पिण्याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. मात्र, ताक कधी कोणत्या वेळेत प्यावे याचे काही नियम आहेत. हे नियम जर पाळले नाही आणि अवेळी ताक प्यायल्याने त्याचे चांगलेच दुष्परिणाम होऊ शकतात. चला विस्ताराने जाणून घेऊ.
ताक
ताकFreepik
Published on

ताक हे आरोग्याला अतिशय उत्तम असते. आयुर्वेदात याचे अमृत औषध म्हणून वर्णन केले आहे. ताकाचे पंचकर्म देखील केले जाते. ताक हे तुमच्या एकूण आरोग्याला नव संजीवनी देते. ताक त्वचा चमकदार बनवते, पचन शक्ती सुधारते, पोटाचे आजार दूर करते, ऊर्जा देते, वजन नियंत्रणात ठेवते, दह्यापासून बनलेले असल्याने दह्यातील Vitamin B12 चे फायदे देते याव्यतिरिक्तही ताक पिण्याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. मात्र, ताक कधी कोणत्या वेळेत प्यावे याचे काही नियम आहेत. हे नियम जर पाळले नाही आणि अवेळी ताक प्यायल्याने त्याचे चांगलेच दुष्परिणाम होऊ शकतात. चला विस्ताराने जाणून घेऊ.

ताक पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?

कडक उन्हात शरीराला गारवा देण्यासाठी आणि डिहायड्रेटेड शरीर पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी ताक पिणे चांगले असते. मात्र ते रिकाम्या पोटी पिऊ नये. ताक पिण्याची विशिष्ट वेळ ठरलेली नाही. सामान्यपणे जेवणानंतर ताक पिणे हे सर्वोत्तम मानले जाते. विशेष करून दुपारच्या जेवणानंतर ताक प्यावे. रात्रीचे जेवण जर ८ वाजण्याच्या आत करणार असाल तर रात्रीच्या जेवणानंतर ताक प्यावे.

ताक कधी पिऊ नये?

ताक अगदी सकाळी सकाळी किंवा रात्री उशिरा पिऊ नये कारण यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. ताकाऐवजी सकाळी न्याहारी नंतर थोडा वेळाच्या अंतराने दही खाल्ले तर चालते. सकाळचे वातावरण थोडे गार असते. त्यामुळे यावेळी ताक पिऊ नये.

ताक कसे असावे?

ताक हे निश्चितच औषधी गुणांनी युक्त आहे. मात्र, ते जर चुकीच्या पद्धतीने बनवलेले असेल तर असे ताक आरोग्याला लाभ देण्याऐवजी हानीच पोहोचवू शकते. आयुर्वेदानुसार नेहमी ताज्या दह्याचे ताक बनवलेले असावे. यामध्ये लोण्याचा अंश नसावा. जास्त दिवस झालेल्या दह्यापासून ताक बनवू नये. कारण असे ताक आंबट असते. ते आरोग्याला फार चांगले नसते. याशिवाय ताक फ्रिजमध्ये ठेवू नये. खूप वेळ फ्रिजमध्ये ठेवलेले ताक आंबट झालेले असते. हे आंबट ताक घशासाठी अपायकारक असते. यामुळे घसादुखीसारखे आजार होतात. त्यामुळे कायम ताज्या दह्यापासून तयार केलेले ताजे ताक प्यावे. जे आरोग्यासाठी उत्तम असते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in