
आजच्या काळात प्रत्येकजण नोकरीच्या शोधात असताना चांगला रिझ्युम, सीव्ही कसा बनवावा, याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी ते गुगल, नोकरी डॉट कॉमवरील अनेक गाईडलाइन्स फॉलो देखील करतात. एक चांगला रिझ्युम किंवा सीव्ही कसा असावा याची माहिती देणारा खूप मोठा कंटेंट गुगलवर उपलब्ध आहे. त्यातच एआयमुळे आता हे आणखी सोपे झाले आहे. मात्र, असे असले तरी रिझ्युम किंवा सीव्ही कसा असावा याचे फिक्स नियम नाहीत. त्यामुळे यासंदर्भात जगभरातील HR आणि बॉस, कॅन्डिडेट निवडताना कसा विचार करतात किंवा कोणकोणते क्रायटेरिया वापरतात यासंदर्भातील नियम देखील काही फिक्स नसतात. फक्त काही ठोकताळे बांधता येतात.
एका मोठ्या कंपनीत एका तरुणाला मार्केटिंगची नोकरी नाकारण्यात आली. हा उमेदवार तसं पाहिलं तर या नोकरीसाठी खूपच परफेक्ट होता. तो एक सक्षम उमेदवार होता. तरीही त्याला नोकरी नाकारण्यात आली. कारण त्याच्या सीव्हीमध्ये नमूद असलेल्या दोन गोष्टी...
काय होता नेमका प्रॉब्लेम?
टॅटलर एशियाचे सीओओ परमिंदर (पॅरी) सिंग यांनी नुकतीच एक X वर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी जुन्या एका कंपनीत असताना त्यांच्या बॉसने त्यांना मार्केटिंगच्या जॉबसाठी उत्तम असणाऱ्या एका तरुणाला नोकरीवर घेऊ नका, असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे ते त्यासाठी काहीच करू शकले नाही. उत्तम असूनही या तरुणाला नोकरी नाकारली होती कारण त्याने त्याचे छंद आणि अन्य गोष्टी सीव्हीत नमूद केल्या होत्या. या तरुणाने त्याच्या सीव्हीत म्हटले होते की तो मॅरेथॉन धावपटू आणि गिटार वादक आहे. परिणामी त्यांच्या बॉसला ही व्यक्ती दिलेली असाइनमेंट पूर्ण करू शकणार नाही, असे वाटत होते.
यह काम कब करेगा ?
परमिंदर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की त्यांच्या बॉसचे शब्द इथे मांडले आहेत. ते म्हणाले की, त्यांचे तत्कालीन बॉस यांनी म्हटले होते, '' यह आदमी यह सब कुछ करता है तो काम कब करेगा?''
सीव्ही मध्ये तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीची माहिती द्यावी की नाही
परमिंदर यांनी गुगल, ॲपल सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये उच्चपदावर नेतृत्व केले आहे. त्यांनी त्यांच्या आठवणीतील हा किस्सा X वर पोस्ट केला. त्यानंतर याची मोठी चर्चा सुरू झाली. तसेच यामुळे आपल्या सीव्ही, रिझ्युममध्ये आपल्या हॉबी किंवा इतर करिक्युलम ॲक्टिव्हिटींची माहिती द्यावी की देऊ नये, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय?
मात्र, याचे काही फिक्स उत्तर देऊ शकत नाही. कारण प्रत्येक पदाप्रमाणे, कंपनी प्रमाणे नियम बदलतात. त्यामुळे सीव्ही अपडेट करताना तुम्ही ज्या पोस्टसाठी ॲप्लाय करणार आहात त्यासाठी एच आर कसे विचार करतात किंवा त्या क्षेत्रातील कार्य करणारे तुमचे सहकारी यांचा देखील सल्ला घ्या...Best Of Luck