होमिओपॅथी उपचारांमुळे कॉफी पिण्यास मनाई केली आहे? 'हा' आहे सर्वोत्तम पर्याय

तुम्ही कॉफी प्रेमी आहात? तुम्हाला कॉफी खूप आवडते? मात्र, होमिओपॅथी उपचार सुरू असल्यामुळे डॉक्टरांनी तुम्हाला कॉफी पिण्यास मनाई केली आहे. तर मग इथे आहे कॉफीला सर्वोत्तम पर्याय सोया कॉफी.
होमिओपॅथी उपचारांमुळे कॉफी पिण्यास मनाई केली आहे? 'हा' आहे सर्वोत्तम पर्याय
Freepik
Published on

तुम्ही कॉफी प्रेमी आहात? तुम्हाला कॉफी खूप आवडते? मात्र, होमिओपॅथी उपचार सुरू असल्यामुळे डॉक्टरांनी तुम्हाला कॉफी पिण्यास मनाई केली आहे. तर मग इथे आहे कॉफीला सर्वोत्तम पर्याय सोया कॉफी. आरोग्याला फायदेशीर असल्याने सध्या सोया कॉफीचा अनेकांनी आपल्या सकाळच्या आहारात समावेश केला आहे. चला जाणून घेऊया काय आहे सोया कॉफी? कशी बनवतात सोया कॉफी.

सोया कॉफी

सोया कॉफी ही सोयाबीन पासून बनवली जाते. ही तुम्हाला घरच्या घरी बनवता येते. मार्केटमध्ये देखील सोया कॉफी पावडर उपलब्ध असते. मात्र, तुम्ही सोयाबीन घरी आणून त्याची पावडर केल्यास ती अतिशय स्वस्त पडते. त्यासाठी तुम्हाला बाजारातून सोयाबीन घेऊन यायचे आहेत. सोयाबीन हे दिसायला थोडेफार चवळीच्या बिनसारखे असतात आणि शेंगदाण्याप्रमाणे भाजता येतात. सोयाबीन छान बदामी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या. त्याची मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर करून घ्या. ही पावडर बाटलीत भरून स्टोअर करून ठेवा.

सोया कॉफी बनवण्याची कृती

सोया कॉफी तीन प्रकारे बनवता येते. सोया कॉफी पावडर पाण्यात उकळून घेऊन आवश्यकतेनुसार साखर टाकून गाळून पिऊ शकता. याला ब्लॅक सोया कॉफी म्हणू शकता. तसेच दुधामध्ये सोयाबीनची पावडर टाकून छान उकळून घ्या. नंतर तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात साखर टाकून घ्या आणि छान उकळू द्या. सोया कॉफी तयार झाली की ती चहाप्रमाणे गाळणीने गाळून घ्या आणि आस्वाद घेत प्या. त्याच प्रमाणे सोया कॉफी दूध पावडरमध्ये देखील बनवता येते गरम पाणी उकळून घ्या. कपात दूध पावडर, सोया कॉफी पावडर आणि साखर टाकून घ्या. गरम उकळलेले पाणी टाकून चमच्याने हे मिश्रण हलवून घ्या. नंतर दुसऱ्या कपात ही कॉफी गाळून घ्या.

का आहे सोया कॉफी आरोग्याला फायदेशीर

सोयाबीन हे प्रोटीनयुक्त असतात. शरीरात प्रोटीनची मात्रा कमी झाल्यास डॉक्टरांकडून अनेकवेळा सोयाबीन व त्याचे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे सोया कॉफी ही प्रोटिनयुक्त असते. त्यामुळे हिला प्रोटिन कॉफी असेही म्हणू शकतात. त्याच प्रमाणे यामध्ये कॉफीतील कॅफिन सारखे हानिकारक घटक देखील नसतात.

logo
marathi.freepressjournal.in