पाहा पालकाची भाजी न आवडणाऱ्यांसाठी 'ताकातली पालक भाजी'ची भन्नाट रेसिपी

कदाचित पालकाची भाजी न आवडणाऱ्यांनी एकदा ही रेसिपी ट्राय करायला हरकतचं नाही. तर आज जाणुन घ्या ताकातली पालक भाजी करण्याची पद्धत
पाहा पालकाची भाजी न आवडणाऱ्यांसाठी 'ताकातली पालक भाजी'ची भन्नाट रेसिपी

पालकची भाजी ऐकलं की अनेकजण नाक मुरडतात, पण पालकाची भाजी ही शरीरासाठी अत्यंत फायदेशिर आहे. पालकाच्या भाजीत भरपूर प्रमाणात आरोग्यासाठी आवश्यक असणारे जीवनसत्व असतात. हिवाळ्यात पालकाची भाजी सहज उपलब्ध ही होते. आम्ही पालकाची भाजी न आवडणाऱ्या लोकांसाठी एक भन्नाट रेसिपी आणली आहे. कदाचित पालकाची भाजी न आवडणाऱ्यांनी एकदा ही रेसिपी ट्राय करायला हरकतचं नाही. तर आज जाणुन घ्या ताकातली पालक भाजी करण्याची पद्धत

साहित्य

पालक, घट्ट ताक, शिजवलेले शेंगदाणे, बेसन, तूप, मोहरी, जिरे, हळद, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरव्या मिरची, आलेपेस्ट, मीठ

कृती

पालक स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घ्यावी, एका भांड्यामध्ये ताक घ्यावे त्यात बेसन घालून एकत्र करावे. गॅसवर कढई ठेवावी आणि त्यात फोडणीसाठी तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात मोहरी ,जिरे घालावे. त्यानंतर हळद, मिरची आणि आले घालावे आणि सर्व नीट परतल्यावर कढीपत्ता घालावा. शेंगदाणे ३-४ तास भिजवून कुकरमध्ये शिजवावे. शिजवलेले शेंगदाणे फोडणीमध्ये घालून परतावे. शेंगदाणे परतल्यावर लगेच त्यात बारीक चिरलेला पालक घालावा. गॅस मध्यम ठेवून पालक नीट शिजवून घ्यावी. पालक शिजल्यावर त्यात घट्ट ताक घालावे आणि नंतर उकळी येण्यापर्यंत ढवळत राहावे.

शेवटी चवीपुरते मीठ घालावे.शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. आणि गरमा गरम ताकातली पालक सर्व्ह करावी. ही ताकातली पालक भाजी तुम्ही सकाळच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ शकता.

logo
marathi.freepressjournal.in