Chocolates Day 2024: 'चॉकलेट डे'च्या निमित्ताने बनवा 'ही' गोड रेसिपी!

लहान असो हा मोठे सर्वांना चॉकलेटे खायला फार आवडते. कोणताही शुभ प्रसंग असला की ,आपण तोंड गोड करून साजरा करतो.
Chocolates Day 2024: 'चॉकलेट डे'च्या निमित्ताने बनवा 'ही' गोड रेसिपी!
PM

लहान असो हा मोठे सर्वांना चॉकलेटे खायला फार आवडते. कोणताही शुभ प्रसंग असला की ,आपण तोंड गोड करून साजरा करतो. दिवाळी, वाढदिवस, रिटर्न गिफ्ट म्हणून सध्या चॉकलेटचे बॉक्स दिले जातात. आज चॉकलेट डे आहे.आजच्याच या दिवशी तुम्हालाही चॉकलेट खाऊन सेलिब्रेशन करायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा .

चॉकलेटसाठी लागणारे साहित्य-

– एक वाटी पिठी साखर

– नारळ तेल किंवा कोकाआ बटर पाऊण कप

– 1 चमचे व्हॅनिला इसेन्स

– पाव कप दुधाची पावडर

– पाऊण कप कोको पावडर

होममेड चॉकलेट बनवा अशाप्रकारे -

-सर्वप्रथम गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यावर एक मोठा वाडगा ठेवा, मग त्यात नारळ तेल किंवा कोकाआ बटर घाला. नंतर त्यात साखर, कोको पावडर आणि दुधाची पावडर घाला. त्यानंतर व्हॅनिला इसेन्स घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.

-जेव्हा ते गुळगुळीत आणि एकधारी दिसू लागतील, तेव्हा आपल्या आवडत्या डिझाइनच्या सिलिकॉन मोल्डमध्ये हे मिश्रण भरा. यासाठी बर्फाचा साचा देखील वापरु शकता. चॉकलेट सेट करण्यासाठी मोल्ड हलक्या हाताने हलवा. यानंतर, तो दोन तास फ्रिजमध्ये ठेवा.

-सेट झाल्यानंतर प्लेटमध्ये एक एक करून चॉकलेट बाहेर काढा. व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी, तळापासून हलका दाब देऊन चॉकलेट पुढे ढकला. नंतर त्यावर थोडाशी पिठी साखर भूरभुरा. झाले तुमचे होममेड चॉकलेट तयार आहे.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in