घरीच बनवा ख्रिसमस स्पेशल एगलेस प्लम केक, वाचा सोपी रेसिपी
घरीच बनवा ख्रिसमस स्पेशल एगलेस प्लम केक, वाचा सोपी रेसिपी

घरीच बनवा ख्रिसमस स्पेशल एगलेस प्लम केक, वाचा सोपी रेसिपी

ख्रिसमसच्या दिवशी वेगवेगळे पारंपारिक पदार्थ बनवले जातात. यापैकी, खास पदार्थ म्हणजे प्लम केक. पारंपारिक प्लम केकमध्ये अंडी, रम आणि फळांचा वापर केला जातो.
Published on

ख्रिसमसच्या दिवशी वेगवेगळे पारंपारिक पदार्थ बनवले जातात. यापैकी, खास पदार्थ म्हणजे प्लम केक. पारंपारिक प्लम केकमध्ये अंडी, रम आणि फळांचा वापर केला जातो. पण काहींना अंड्यांचा प्लम केक आवडत नाही. मग त्यांच्यासाठी पर्याय म्हणून एगलेस प्लम केक उत्तम ठरतो. हा एगलेस प्लम केक कसा करायचा? त्याच्यासाठी काय साहित्य लागेल? घरच्या-घरी सोप्या पद्धतीने हा केक कसा बनवायचा, जाणून घेऊयात.

केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १/२ कप बटर

  • ३/४ कप बारीक केलेली ब्राउन साखर

  • १ चमचा व्हॅनिला एक्सट्रॅक्ट

  • २ चमचे किसलेले संत्र्याचे साल

  • १ १/२ कप मैदा

  • २ चमचे कोको पावडर

  • १/४ चमचा दालचिनी पावडर

  • १/८ चमचा लवंग पावडर

  • १/८ चमचा जायफळ पावडर

  • १/४ चमचा आल्याची पावडर

  • १ चमचा बेकिंग पावडर

  • १/२ चमचा बेकिंग सोडा

  • ३/४ कप चिरलेले मिक्स नट्स

  • १ कप दूध

  • काळे मनुके

  • संत्र्याचा रस

  • जर्दाळू

  • मनुके

  • टूटी-फ्रुटी

  • क्रॅनबेरी

एगलेस प्लम केक बनवण्याची सोपी पद्धत

सर्वप्रथम एका भांड्यात संत्र्याचा रस घ्या. त्यात क्रॅनबेरी, जर्दाळू, मनुके, काळे मनुके आणि टूटी-फ्रुटी मिक्स करुन ३० मिनिटांसाठी भिजवा. यामुळे केकला छान चव येते.

बॅटर बनवण्यासाठी, एका भांड्यात बटर आणि ब्राऊन शुगर एकत्र करा आणि चांगले फेटून घ्या. त्यात व्हॅनिला एक्सट्रॅक्ट आणि संत्र्याची साल मिक्स करा. मैदा, कोको पावडर, दालचिनी, लवंग, जायफळ, आलं पावडर, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र चाळून घ्या आणि मिश्रणामध्ये मिक्स करा.

यानंतर, तयार केलेल्या मिश्रणात दूध घाला आणि बॅटर एकजीव होईपर्यंत फेटून घ्या. आता, यामध्ये भिजवलेले ड्राय फ्रुट्स आणि मिक्स्ड नट्स घालून बॅटर हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करुन घ्या. बटर लावलेल्या केक टिनमध्ये बॅटर ओतून सेट करुन घ्या. यानंतर, ओव्हन १८० अंश सेल्सिअसवर प्रीहीट करुन केक ३०-३५ मिनिटांसाठी बेक करा. टूथपिकचा वापर करुन केक तयार झाला आहे की नाही ते चेक करा. केक तयार झाल्यावर थंड होऊ द्या. तुमच्या आवडीनुसार चॉकलेट किंवा तुटी- फ्रुटीने केक सजवा आणि सर्व्ह करा.

logo
marathi.freepressjournal.in