तुम्हीसुद्धा खोबरेल तेल फक्त केसांना लावण्यासाठी वापरता? तर तुम्ही 'या' फायद्यांना मुकणार

खोबरेल तेल आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे. केसांना लावण्यासाठी आपण दररोज त्यांचा वापर करतो. मात्र, खोबरेल तेल हे फक्त केसांना लावण्यासाठीच फायदेशीर नाही तर त्याचे अन्यही अनेक उपयोग आहेत.
तुम्हीसुद्धा खोबरेल तेल फक्त केसांना लावण्यासाठी वापरता? तर तुम्ही 'या' फायद्यांना मुकणार
Freepik
Published on

खोबरेल तेल आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे. केसांना लावण्यासाठी आपण दररोज त्यांचा वापर करतो. मात्र, खोबरेल तेल हे फक्त केसांना लावण्यासाठीच फायदेशीर नाही तर त्याचे अन्यही अनेक उपयोग आहेत. तुम्ही जर फक्त केसांना लावण्यापुरतेच खोबरेल तेलचा उपयोग करत असाल तर तुम्ही याच्या अन्य अनेक फायद्यांपासून मुकणार आहात. जाणून घ्या नारळाच्या तेलाचे अन्य महत्त्वाचे उपयोग...

ओठांसाठी उपयुक्त

तुमचे ओठ काळपट पडले असेल किंवा ओठ फाटण्याचा त्रास असेल तर रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर किमान दोन वेळा ओठांना खोबरेल तेल लावा. याचा निश्चितच चांगला उपयोग होतो.

उत्तम मेकअप रिमुव्हर

चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी खोबरेल तेल सर्वोत्तम आहे. मेकअप करताना आपण अनेक कॉस्मेटिक्स प्रोडक्ट वापरतो. मात्र, हा मेकअप योग्य पद्धतीने काढला नाही तर चेहऱ्यावर रॅशेश येऊ शकतात. त्यामुळे मेकअप रिमुव्ह करण्यासाठी खोबरेल तेल हा सर्वोत्तम पर्याय आहे. यातील पोषक घटकांमुळे मेकअपमुळे रूक्ष झालेली कोरडी त्वचा मऊ होते.

हाताच्या कोपऱ्यांवरील डाग घालवणे

हाताच्या कोपऱ्यांवर अनेक वेळा लक्ष न दिल्यामुळे काळा थर चढतो किंवा ते काळवंडतात. याला दूर करण्यासाठी अर्धा चमचा खोबरेल तेलात अर्ध्या लिंबाचा रस पिळा हे मिश्रण हाताच्या कोपरे आणि अन्य ज्या ठिकाणी डाग आहेत त्या ठिकाणी लावा.

टाचाच्या भेगा

टाचांना भेगा पडल्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी पेट्रोलियम जेलीसोबत नारळाच्या तेलाने मसाज करणे फायदेशीर ठरते. सकाळी कोमट पाण्याने पाय स्वच्छ करावे.

आंघाळीपूर्वी त्वचेला खोबरेल तेल लावावे

आंघोळ केल्यानंतर अनेकांना खाज सुटण्याचा त्रास असतो. त्यांनी आंघोळीपूर्वी खोबऱ्याचे तेल कोमट करून त्याने मालीश करावी. नंतर उटण्याने आंघोळ करावी. आंघोळीनंतर अंगाला अजिबात खाज सुटणार नाही. तसेच नारळाच्या तेलात कापूर मिसळून त्वचेवर लावल्यानेही फायदा होतो.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in