कॉफीतील कॅफिन हानिकारक पण आरोग्याला काही फायदेही होतात; जाणून घ्या प्रमाण किती असावे...

कॉफीमध्ये असलेले कॅफिन हे घटक आरोग्याला हानिकारक असते. याविषयी अनेक चर्चा होतात. किंबहुना यामुळेच अनेक जण कॅफिनरहित कॉफीचे पर्याय शोधत असतात. जसे की प्रोटिन कॉफी, चिकोरी कॉफी इत्यादी. मात्र, कॉफीचे प्रमाण एका मर्यादित स्वरुपात ठेवल्यास कॉफी पिणे हे आरोग्याला फायदेशीर ठरते. कारण कॅफिन या घटकाचे तोटे आहेत तसेच काही फायदेही आहेत. चला जाणून घेऊया कॉफी आणि कॅफिनचे काय असतात फायदे.
कॉफीतील कॅफिन हानिकारक पण आरोग्याला काही फायदेही होतात; जाणून घ्या प्रमाण किती असावे...
Freepik
Published on

कॉफीमध्ये असलेले कॅफिन हे घटक आरोग्याला हानिकारक असते. याविषयी अनेक चर्चा होतात. किंबहुना यामुळेच अनेक जण कॅफिनरहित कॉफीचे पर्याय शोधत असतात. जसे की प्रोटिन कॉफी, चिकोरी कॉफी इत्यादी. मात्र, कॉफीचे प्रमाण एका मर्यादित स्वरुपात ठेवल्यास कॉफी पिणे हे आरोग्याला फायदेशीर ठरते. कारण कॅफिन या घटकाचे तोटे आहेत तसेच काही फायदेही आहेत. चला जाणून घेऊया कॉफी आणि कॅफिनचे काय असतात फायदे.

उदासीनता दूर करते

कॉफीतील कॅफिन हा घटक मनाला उत्तेजित करते. त्यामुळे तुम्ही जर खूप उदास अवस्थेत असाल तर कॅफीन हा घटक तुमच्या मनाला उत्तेजित करून पुन्हा एकदा सक्रिय करतो.

मूड सुधारतो

कॅफिन ज्या प्रमाणे मन उत्तेजित करतो त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या मूडवरही होतो. यामुळे तुम्ही अधिक आनंदी आणि उत्साही राहू शकता.

एकाग्रता वाढते

कॉफी थेट मनावर परिणाम करणारी असते. त्यामुळे कॉफी पिल्याने मनातील एकाग्रता वाढते.

अँटिऑक्सिडंट्स

कॅफिन हे काही प्रमाणात अँडिऑक्सिडंट्स म्हणून कार्य करतात. त्यामुळे शरीरातील हानिकारक घटकांशी लढण्यास मदत मिळते.

वजन कमी होण्यास मदत

कॅफीन हे शरीराची चरबी जाळण्यास मदत करते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कॉफी पिणे फायदेशीर ठरते.

चयापचय क्रिया वाढते

कॉफीतील कॅफिन हा घटक चयापचय क्रिया सुरळीत करण्यास मदत करतो. त्यामुळे उष्णता वाढली तरी शरीर अधिक कार्यक्षम होते.

उर्जा मिळते

तुम्हाला दिवसभर धावपळ करायची असेल आणि यामुळे तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तर अशा परिस्थितीत कॉफी तुम्हाला तातडीने ऊर्जा प्रदान करते.

दिवसातून १ ते २ कप कॉफी पिणे चांगले असते जास्तीत जास्त ३ ते ४ कप घेऊ शकता. मात्र, त्यापेक्षा जास्त कॉफी ही शरीराला प्रचंड नुकसानदायक असते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in