Maharashtra HSC 12th Result: बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे करा अभिनंदन, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!

Congratulations Messages in Marathi: बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश पाठवून त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करा.
Maharashtra HSC 12th Result: बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे करा अभिनंदन, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
Freepik

Wishes for HSC 12th Pass out Students: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. वर्षभर भरपूर मेहनत करून यंदा १३,२९,६८४ उत्तीर्ण झाले आहे. यंदा राज्याचा ९३.३७ टक्के इतका निकाल लागला आहे. या भरगोस यशासह विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. मेहनत केल्यानंतर यश मिळते आणि यश मिळाल्यावर आनंद मिळतो. हा मेहनीतीचा आनंद साजरा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत (HSC 12th Result Wishes, Status, Images, Quotes, Messages & Greetings) शुभेच्छा संदेश.

पाठवा हे शुभेच्छा संदेश

> मेहनत नेहमी फळाला येते हे,

तू पुन्हा एकदा दाखवून दिलंस

यशासाठी खूप खूप अभिनंदन!!

> स्वतःवर विश्वास ठेवल्याने आणि मेहनतीमुळेच हे घडलं आहे.

परीक्षेत उत्तम गुण मिळविल्याबद्दल अभिनंदन...

> तुझ्यासारख्या व्यक्तीला नेहमीच आयुष्यात असे भरभरून यश मिळायला हवे हीच इच्छा...

तुझा यशासाठी मनापासून अभिनंदन शुभेच्छा...!!

> आयुष्यात इतक्या अडचणींचा सामना करून मिळवलेल्या या यशाबद्दल अभिनंदन!

तुला आयुष्यात जे हवं ते मिळो हीच इच्छा. मनापासून हार्दिक अभिनंदन...

> प्रेमपूर्वक आणि अभिमानाने तुझे हार्दिक अभिनंदन. तुला कल्पनाही करता येणार नाही इतके तुझ्या यशासाठी मला आनंद झाला आहे congratulations!

>  तुला आयुष्यात जे हवं ते मिळो हीच इच्छा.. तुझ्या उज्वल यशाबद्दल खूप खूप अभिनंदन..!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

logo
marathi.freepressjournal.in