
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. अनेक विवाहेच्छुक तरुण-तरुणींचे लग्न ठरत आहे. वधू आणि वर यांना या दिवशी सर्वांपासून हटके दिसायचे असते. त्यांचा लूक आणि सौंदर्य सर्वांमध्ये उठून दिसायला हवे अशी सर्वांची इच्छा असते. त्यासाठी लग्नाआधीपासून तयारी चालू असते. त्यासाठी पार्लरमध्ये जाऊन आपले सौंदर्य उजळवण्यासाठी फेशिअल तसेच विविध ट्रीटमेंट्स घेतल्या जातात. जेणेकरून लग्नाच्या दिवशी वधू आणि वर दोघांचा चेहरा चमकदार दिसेल. मात्र, एवढेच पुरेसे नाही तर यासाठी आहारातही काही बदल करायला हवा. जाणून घ्या आहारात बदल करून तुमचा चेहरा १५ दिवसात चमकदार कसा बनेल...
नारळ पाणी
नारळ पाणी हे निसर्गाचे वरदान आहे. जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. त्वचा, केस यांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवते. पचनक्रिया सुधारते. त्यामुळे त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या सुटतात. चेहरा चमकदार होतो.
काळे खजूर
काळे खजूर हे रक्तशुद्ध करते. रक्तशुद्ध झाल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही. हिमोग्लोबीन वाढते. यामुळे त्वचा चमकदार होते. तर यातील फायबर, लोह, प्रथिने आणि खनिजांमुळे त्वचेला आणि शरीराला पोषण मिळते.
कलिंगडाचे सरबत किंवा ज्यूस
कलिंगडाचे सरबत किंवा ज्यूस शरीराला हायड्रेट ठेवतो. पाण्याच्या प्रमाणाचे संतूलन राहिल्यामुळे त्वचेला पोषण मिळते. त्यामुळे चेहऱ्यावरील चमक आणि सुंदरता वाढते.
गुलकंदाचे पाणी
ताजे गुलकंद रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात घालून हे पाणी प्यावे. गुलकंद हा गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या आणि साखरेचा बनलेला असतो. हे दोन्ही घटक त्वचेला उजळवण्याचे कार्य करते. गुलाबाच्या पाकळ्यांमधील गुणधर्मांमुळे अतिरिक्त घाम येण्याचा त्रास निघून जातो. तसेच शरीर थंड राहते. त्यामुळे चेहऱ्यावर पुटकूळ्या येत नाही. याशिवाय त्वचेच्या अन्य समस्याही दूर होतात.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)