वजन कमी करण्यासाठी 'या' धान्यांच्या चपात्यांचे करा सेवन

निरोगी आणि वजन कमी करण्यासाठी अनेक धान्यांच्या, पिठाच्या भाकरी किंवा चपात्या तुम्हाला मदत करतात.
वजन कमी करण्यासाठी 'या' धान्यांच्या चपात्यांचे करा सेवन

रोजच्या जेवणात चपाती हा महत्त्वाचा भाग आहे, चपातीशिवाय भाजी, डाळ किंवा चटण्यांची चव अपूर्ण वाटते. तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करतात तेव्हा तुम्हाला चपाती, भात आणि ब्रेड यांसारखे कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आता निरोगी आणि वजन कमी करण्यासाठी अनेक धान्यांच्या, पिठाच्या भाकरी किंवा चपात्या तुम्हाला मदत करतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या पिठापासून बनवलेल्या भाकरी वजन कमी करण्यात मदत करतात.

बाजरीचे पीठ-

बाजरीच्या भाकरीचे सेवन केल्याने वजन कमी होते. बाजरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. बाजरी आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक असते. कारण बाजरी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. बाजरी पचनास मदत देखील करते. तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करते. एवढेच नाही तर बाजरी काही प्रकारच्या कर्करोगाचा धोकाही कमी करते.

ओट्सचे पीठ-

ओट्स पीठ हा देखील एक आरोग्यदायी पर्याय आहे. ओट्समध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. जे आपले पोट दीर्घकाळ भरलेलं ठेवते आणि भूक कमी करते. ओटचे पीठ वजन कमी करण्यास, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास, तसेच हृदयविकाराचा धोका कमी करण्यस मदत करते

बेसनाचे पीठ-

बेसन हे प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. गव्हाच्या पिठापेक्षा बेसनामध्ये कमी
कॅलरीज असतात. बेसन वजन कमी करण्यास मदत करते तसेच पचन सुधारते आणि अ‍ॅनिमियावर चांगला उपचार करते.

ज्वारीचे पीठ-

ज्वारीचे पीठ ग्लूटेन मुक्त असते. त्यामुळे सेलिक रोग किंवा गव्हाची ऍलर्जी
असलेल्या लोकांसाठी ज्वारीचे पीठ एक चांगला पर्याय बनते. ज्वारीचे पीठ हे प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि लोहाचा चांगला स्रोत आहे. ज्वारीचे पीठ वजन कमी करण्यास मदत करते. त्याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास देखील मदत करते.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in