मधुमेहाच्या रुग्णांना 'या' भाज्यांचे करा सेवन, शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी ठरते उपयोगी

मधुमेहाच्या रुग्णांना कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. काही भाज्या अशा आहेत, ज्यांचे सेवन मधुमेही रुग्ण करू शकतात.
मधुमेहाच्या रुग्णांना 'या' भाज्यांचे करा सेवन,  शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी ठरते उपयोगी
Published on

मधुमेही रुग्णांनी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा झटका, किडनी निकामी होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यांसारख्या जीवघेण्या परिस्थितीचा धोका वाढतो. मधुमेहाच्या रुग्णांनी आहाराची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांना कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्याचा ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होतो. काही भाज्या अशा आहेत, ज्यांचे सेवन मधुमेही रुग्ण करू शकतात.

1. फ्रोजन मटर
मधुमेहाचे रुग्ण फ्रोजन मटर खाऊ शकतात. कारण त्यात पोटॅशियम, लोह आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते. फ्रोजन मटरच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

2. रताळे
हिवाळ्यात मिळणारे रताळे खायला खूप चविष्ट असते. त्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते, त्यामुळे मधुमेही रुग्ण त्यांच्या आहारात रताळ्याचा समावेश करू शकतात.

3. ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. यामध्ये फायबरसोबतच व्हिटॅमिन ए, सी आणि के चे प्रमाणही आढळते, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

4. गाजर
गाजराच्या भाजीबरोबरच त्याचा हलवाही लोक आवडीने खातात.
कच्च्या गाजराचा जीआय फक्त 14 असतो. तसेच त्यात स्टार्चचे प्रमाण खूप कमी असते.
त्यामुळे मधुमेही रुग्ण त्यांच्या आहारात गाजराचा समावेश करू शकतात.

याशिवाय मधुमेही रुग्ण फरसबी, वांगी, मिरी, पालक, टोमॅटो, शतावरी, फ्लॉवर आणि लेट्यूसचे सेवन करू शकतात.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in