उन्हाळ्यात पंखे, एसी आणि कुलरपेक्षा 'या' गोष्टींनी घर करा थंड, आणि वीज बिलपासुन मिळवा सुट्टी

ज्यामुळे उन्हाळ्यात वीज बिल कमी येईल आणि तुम्हालाही घरात गेल्यावर थंडगार वाटेल. ते कसे? तर, चला जाणून घेऊया.
उन्हाळ्यात पंखे, एसी आणि कुलरपेक्षा 'या' गोष्टींनी घर करा थंड, आणि वीज बिलपासुन मिळवा सुट्टी

उन्हाळा म्हंटलं की आठवतो तो म्हणजे उकाडा, चमकणारं ऊन, गर्मी, दिवस-रात्र गरगर फिरणारे पंखे, एसी आणि कुलर. मग तेवढ्याच स्पीडने मिटरही पळतं आणि येत भरमसाठ वीज बिल. त्याामुळेच आम्ही तुम्हाला अश्या काही महत्त्वाच्या टिप्स देणारं आहोत, ज्यामुळे उन्हाळ्यात वीज बिल कमी येईल आणि तुम्हालाही घरात गेल्यावर थंडगार वाटेल. ते कसे? तर, चला जाणून घेऊया.

झाडे लावा

खेडेगावात गेल्यावर अनेकदा नैसर्गिक थंडावा जाणवतो. कारण याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावलेली असतात. त्यामुळे त्याठिकाणी नैसर्गिक थंडावा असतो. तुम्हालाही नैसर्गिक थंडावा अनुभवायचा असेल तर तुम्ही देखील तुमच्या टेरेस आणि बाल्कनीमध्ये विविध झाडांची लागवड करा. घराभोवती जास्तीत जास्त झाडे लावा. वनस्पती स्वत:च्या वाढीसाठी सूर्याची किरणे थेट शोषून घेतात. यासोबतच झाडे आणि उष्ण वाऱ्यांना थंडावा देण्याचा काम करतात. त्यामुळे घरातील उष्णतेचे प्रमाण जास्त जाणवत नाही.  

घर ठेवा मोकळे 

तुम्ही घर जेवढे मोकळे ठेवाल तेवढी उष्णता कमी होते. त्यामुळे घर स्वच्छ आणि मोकळे ठेवण्याचा प्रयत्न करा. घर जितके मोकळे आणि रिकामे असेल तितकेच तुमचे घर थंड राहण्यास मदत होईल. 

घरात टांगा बांबूचे पडदे

घरातील खिडक्यांना बांबूचे पडदे टांगा. यामुळे घर थंड तर होतेच तसेच घरातील उष्ण वारे टाळण्यासाठीही मदत होते. विशेष म्हणजे घराला थंड ठेवण्यासोबतच त्याचे सौंदर्यही वाढवते.  

घराला द्या पांढरा रंग 

उन्हाळ्यात पांढऱ्या रंगामुळे घर थंड होते. अशा परिस्थितीत घराला थंड ठेवण्यासाठी छताला पांढऱ्या चुन्याचा रंग द्या. यामुळे उष्णता आत खेचली जात नाही. तसेच पांढऱ्या रंगाने घर फ्रेश आणि ताजेतवाने दिसते. त्यामुळे घराला पांढरा रंग देणे कधीही उत्तम मानले जाते. 

घराचे दार आणि खिडक्या उघडा

तुम्हाला घरात थंडावा हवा असेल तर घराची दारे आणि खिडक्या उघडे ठेवा. यामुळे घर थंड राहण्यास मदत होईल. दररोज सकाळी आणि सायंकाळी घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवणे फार गरजेचे आहे. त्यामुळे एसी कूलर नसतानाही घर थंड होऊ शकते. 

logo
marathi.freepressjournal.in