झोपेतून उठताना तुम्ही देखील 'ही' चूक करता? सावधान, हृदयविकाराचा धक्का येण्याची शक्यता

झोपेतून उठत असताना देखील काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा हृदयविकाराचा धोका संभवतो. जाणून घेऊया काय आहेत झोपण्याचे आणि झोपेतून उठतानाचे सूक्ष्म नियम...
झोपेतून उठताना तुम्ही देखील 'ही' चूक करता? सावधान, हृदयविकाराचा धक्का येण्याची शक्यता
freepik
Published on

झोप ही शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. चांगली आणि गुणवत्तापूर्ण झोप नैसर्गिकरित्या येणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण मानले जाते. मात्र, झोप घेताना आपल्याला आपल्या झोपण्याच्या पोझिशनवर नीट लक्ष द्यायला हवे अन्यथा त्यामधून वेगवेगळे त्रास उद्भवतात. उदाहरणार्थ कंबरेपासून मांड्यांपर्यंतच्या भागात चरबी वाढणे. पाठीच्या मणक्यात त्रास होणे, मणक्यांवर दाब आल्याने मानदुखी, कंबरदुखी, पायाच्या पोटऱ्या दुखण्यासारखे आजार होतात. तसेच याचा हृदयावरही विपरित परिणाम होतो. याशिवाय झोपेतून उठत असताना देखील काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा हृदयविकाराचा धोका संभवतो. जाणून घेऊया काय आहेत झोपण्याचे आणि झोपेतून उठतानाचे सूक्ष्म नियम...

झोपण्याची योग्य पोझिशन

सर्वप्रथम झोपण्याची योग्य पोझिशनमध्ये झोपावे. झोपण्याच्या योग्य पोझिशन खालीलप्रमाणे आहेत.

झोपताना कायम सरळ झोपावे. अर्थात चेहरावर कंबर, पाठ, पाय एका सरळ रेषेत असावे.

एका अंगावर झोपतानासुद्धा सरळ एका रेषेत झोपावे. पाय पोटात घेऊ नये.

पोटावर झोपण्याचे आरोग्याला अनेक तोटे होतात. त्यामुळे पोटावर झोपणे टाळावे. क्वचितप्रसंगीच पोटावर झोपावे.

झोपेतून उठताना काय घ्याल काळजी?

योग्य पोझिशनमध्ये झोपल्याचे फायदे होतात. तसेच झोपेतून उठण्याचीसुद्धा योग्य पद्धत आहे. अन्यथा हृदयविकाराचा धक्का येऊ शकतो. तसेच अन्यही त्रास उद्भवू शकतात.

आपण अनेकवेळा झोपेत कूस वळवत असतो. त्यामुळे कधी उजव्या खांद्यावर तर कधी डाव्या खांद्यावर भार येतो. तसेच आपल्याला आपण कोणत्यावेळी कोणत्या बाजूने झोपलो आहोत हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे डोळे उघडल्यानंतर आपण ज्या बाजूने झोपतो त्याच बाजूने उठतो. मात्र, असे करणे हे चुकीचे आहे.

झोपेतून उठताना शक्यतो उजव्या बाजूनेच उठावे. आपण जर डाव्या बाजूने झोपत असाल तरी प्रथम कूस वळवून उजव्या बाजूला व्हावे. नंतर उठताना भार उजव्या हातावर द्यावा आणि हळूहळू उठावे. डाव्या बाजूला आपले हृदय असते. त्यामुळे झोपेतून उठताना डाव्या बाजूने उठल्यामुळे हृदयावर भार येऊन हृदयविकाराचा धोका संभवू शकतो. याशिवाय योगासन करतानाही झोपून करण्याचे जे आसन आहेत. त्या क्रियांमध्येही उजव्या बाजूनेच उठावे. डाव्या बाजूने उठणे टाळावे.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in