...म्हणून फ्रीजमधील काकडी खाऊ नये

काकडीमध्ये असलेल्या गुणधमांमुळे शरीरातील मूत्रविकारासाठी, काकडी ही उपयुक्त असते. आयुर्वेदात काकडीला महत्त्व अधिक आहे.
...म्हणून फ्रीजमधील काकडी खाऊ नये

काकडीमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस 'क' जीवनसत्त्व, पोटॅशियम, मीठ, मॅग्नेशियम, गंधक, सिलिकॉन, ग्लोरीन, बम्लोरीन आणि तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. काकडी ही शीतल, पित्तशामक आहे. त्याचप्रमाणे काकडीमध्ये असलेल्या गुणधमांमुळे शरीरातील मूत्रविकारासाठी, काकडी ही उपयुक्त असते. आयुर्वेदात काकडीला महत्त्व अधिक आहे.

काकडी फ्रीजमध्ये का ठेवू नये?

काकडी थंड असते. त्यामुळे तिच्या अति सेवनानं खोकला, सर्दी होते. म्हणूनच ती फ्रीजमध्ये ठेवून अधिक थंड करू नये. त्याचबरोबर तिच्यामधील पोषणमूल्येही कमी होतात. म्हणून ती फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवून सामान्य तापमानातच खावी.

काकडी सालीसकट का खावी ?

काकडीत विपूल प्रमाणात खनिजे आहेत. अनेक जण काकडीची साल काढून ती खातात; पण शक्यतो साल काढूच नये. कारण काकडीच्या सालीतच क्षार आणि जीवनसत्त्वे विपूल प्रमाणात असतात. साल काढल्यानं ते निघून जातात. म्हणून ती सालीसकटच खावी.

काकडीचे फायदे

■ आम्लपित्त, गॅसेस यांसारख्या विकारांवर काकडी फायदेशीर आहे. यामुळे पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो.

■ शरीरावरील भाजलेल्या जखमेची आग होत असेल तर काकडीचा रस लावल्यास लवकर आराम पडतो.

■ निद्रानाश ही समस्या भेडसावत असेल तर काकडीचे काप डोक्यावर ठेवून झोपल्यास झोप लवकर येते.

■ भूक मंद झाली असेल तर काकडीचे काप करून पुदिना, काळे मीठ, लिंबू रस, मिरे व जिरेपूड घालून खावेत. यामुळे भूक चांगली लागते.

logo
marathi.freepressjournal.in