डोळ्याभोवती डार्क सर्कल आहेत? 'हे' आहेत साधे सोपे घरगुती उपाय...

अपुऱ्या झोपेमुळे, मोबाईल आणि स्क्रीनच्या जास्त प्रमाणात वापरामुळे तुमच्या देखिल डोळ्याभोवती डार्क सर्कल जमा झालेत? त्यासाठी हे उपाय नक्की करा.
डोळ्याभोवती डार्क सर्कल आहेत? 'हे' आहेत साधे सोपे घरगुती उपाय...
फोटो सौ FPJ
Published on

अपुऱ्या झोपेमुळे, मोबाईल आणि स्क्रीनच्या जास्त प्रमाणात वापरामुळे तुमच्या देखिल डोळ्यांभोवती डार्क सर्कल जमा झालेत? त्यासाठी हे उपाय नक्की करा.

काकडी
आपल्या डोळ्यांच्या भोवतालचे काळे डाग घालवण्यासाठी काकडीला गोल कापा. काकडीमुळे डोळ्यांना आराम आणि गारवही मिळतो. काकडीचे कापलेले स्लाइस थंड असतात. डोळ्यांखालील काळे वर्तुळे जाण्यास ते मदत करतात. काकडीचे गोल भाग दिवसातून दोन ते तीन वेळा १o मिनिटे डोळ्यांवर ठेवा.

फोटो सौ Free Pik



पुरेशी झोप
झोपेचे वेळापत्रक बनवा आणि वेळेवर झोप घ्या. पुरेशी झोप घेत नसल्याने डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. झोपेमुळे डोळ्यांवरील ताण कमी होऊन ते काळे पडणार नाहीत.

फोटो सौ FPJ



टोमॅटो
टोमॅटो तुमच्या डोळ्यांच्या भोवतालचे काळे डाग कमी करण्यास मदत करतात. एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाचा रस एकत्र करून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्यांखाली लावावे. पाच ते दहा मिनिट तसेच ठेवावे. त्यानंतर थंड पाण्याने डोळे धुवून घ्यावे.

फोटो सौ FPJ



बदाम तेल
बदाम तेलात अनेक गुणधर्म असतात, बदाम तेलाचा डोळ्याजवळील त्वचेला लाभ मिळतो. या तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंगही उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्यांखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावी. सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा.

फोटो सौ FPJ

डोळ्याभोवतालचे काळे डाग घालवण्यासाठी मध आणि लिंबाचा रस एकत्र करुन त्याचे मिश्रन लावावे. १५ ते २० मीनट तसेच राहू द्यावे. त्यानंतर डोळे साध्या पाण्याने धुवावे. असे रोज करावे तुम्हाला काही दिवसात फरक दिसू लागेल.

फोटो सौ FPJ

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)

logo
marathi.freepressjournal.in