Guru Purnima 2024: २० की २१ जुलै कोणत्या तारखेला गुरु पौर्णिमा साजरी होणार? जाणून घ्या महत्व

Significance of Guru Purnima: गुरु पौर्णिमा हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर कृतज्ञता, आदर आणि शिक्षक आणि शिष्य यांच्यातील सुंदर बंधनावर भर देणारा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सण आहे.
Guru Purnima 2024: Dates, Timings, Significance And All You Need To Know
Guru Purnima 2024: Dates, Timings, Significance
Published on

Guru Purnima History: आषाढ या हिंदू महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरी होणारी गुरु पौर्णिमा फार महत्त्वाची असते. याला विविध संस्कृतींमध्ये, विशेषत: हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मात खूप महत्त्व आहे. हा शुभ दिवस गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. या सणाच्या तारखेबाबत मात्र काहीसा गोंधळ आहे. काहींच्या मते हा सण २० जुलैला आहे तर काही लोक म्हणत आहेत की हा सण २१ जुलैला साजरा केला जाईल. चला हा गोंधळ दूर करूयात.

गुरु पौर्णिमा २०२४ ची तारीख आणि वेळ

यंदा २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. पण या शुभ दिवसाचा शुभ मुहूर्त २०जुलै रोजी संध्याकाळी ५.५९ पासून सुरू होईल आणि २१ जुलै रोजी दुपारी ३.४६ वाजता समाप्त होईल. वैदिक धर्मात सूर्योदयापासून तिथी मानली जाते आणि म्हणूनच २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा उपवास केला जातो.

गुरुपौर्णिमेचे महत्त्व

गुरुपौर्णिमा हा मुख्यतः एखाद्याच्या जीवनातील गुरु किंवा शिक्षकांना धन्यवाद देण्याचा दिवस आहे. अंधार (अज्ञान) दूर करणारे आणि आपल्या शिष्यांना ज्ञानाकडे नेणारे म्हणून गुरु कडे बघितले जाते.

परंपरा आणि विधी

या दिवशी भक्त उपवास करतात. अनेक लोक ध्यान करतात, मंत्र म्हणतात आणि त्यांच्या गुरूंना प्रार्थना करतात. काही परंपरांनुसार, शिष्य गुरुंचा आदर व्यक्त करण्यासाठी गुरू पूजा देखील करतात.

logo
marathi.freepressjournal.in