'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस गळतात आणि वजनही वाढतं, पाहा 'कोणत्या' जीवनसत्वाची आहे शरीरात कमतरता

जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर तुम्हाला त्याची काही खास लक्षणे दिसतात.
'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस गळतात आणि वजनही वाढतं, पाहा 'कोणत्या' जीवनसत्वाची आहे शरीरात कमतरता
Published on

आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. व्हिटॅमिन डी हाडांच्या मेटाबॉलिज्मसाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी हे चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे जे अन्नामध्ये असते किंवा शरीरात तयार होते. उन्हात किंवा सूर्यप्रकाशात असताना देखील त्वचेत व्हिटॅमिन डी तयार होते. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर तुम्हाला त्याची काही खास लक्षणे दिसतात.

‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेची लक्षणे

1. थकवा
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. योग्यप्रकार जेवण केल्यानंतर आणि रात्री 7-8 तास झोपल्यानंतरही थकवा जाणवत असेल, तर ते शरीरातील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे असू शकते.

2. केस गळणे
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे केस गळतात. हे पोषक तत्व केसांच्या फॉलिकल्सना वाढण्यास मदत करते. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि केस गळण्याची शक्यता असते

3. मूडवर परिणाम
विनाकारण उदास आणि दु:खी वाटणे ही देखील शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे आहेत. मूड सुधारण्यात सूर्यप्रकाशाची मोठी भूमिका असते. यामुळे मेंदूतील सेरोटोनिन हार्मोनचे उत्पादन वाढते जे आनंदी ठेवण्यास मदत करते.

4. हाडे, सांधे दुखणे
शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. जर शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर कॅल्शियम पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाही आणि त्यामुळे हाडे आणि स्नायूंमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. दात निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियमचे प्रमाणही आवश्यक आहे. जर वारंवार पाठ किंवा स्नायू दुखत असतील तर ते शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. 

5. वजन वाढणे
व्हिटॅमिन डी शरीराला नायट्रिक ऑक्साईड देते. नायट्रिक ऑक्साईड हे एक महत्त्वाचे पोषकतत्व आहे, जे ओव्हर इटिंगपासून रोखते आणि मेटाबॉलिज्म वाढवते. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे वजन वाढू शकते..

या गोष्टींचा आहारात करा समावेश

मशरूम व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी देखील मुबलक प्रमाणात असते. गाईचे दूध, सोया दूध, संत्र्याचा रस या सर्व गोष्टींचे सेवन केल्यास फायदा होईल.याशिवाय फॅटी फिश, ट्यूना आणि सॉलमनचे सेवन करा. चीज, दूध, टोफू, दही, अंडी यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. सकाळचे कोवळे उन अंगावर घ्या.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in