Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशी का साजरी केली जाते? जाणून घ्या महत्त्व आणि पूजेची वेळ

Ashadhi Ekadashi 2024 Significance: देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी यंदा १७ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.
Ashadhi Ekadashi 2024 Puja At Home
Ashadhi Ekadashi 2024 Date, Time, Rituals and SignificanceFPJ
Published on

Ashadhi Ekadashi 2024 Date: आषाढी एकादशीला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या एकादशीपासून चातुर्मासही सुरू होतो. आषाढी एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. भागवत संप्रदायांसाठी हा दिवस विशेष मानला जातो. महाराष्ट्रातील हजारो भाविक वारी करून पंढरपूरला जातात. परंतु तुम्हाला पंढरपूरला (Pandharpur)जायला मिळालं नसेल तर तुम्ही घरच्या घरी मनोभावे पूजा (Ashadhi Ekadashi 2024 Puja At Home) करू शकता.

आषाढी एकादशी २०२४ तारीख आणि वेळ

यंदा १७ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. एकादशी तिथी १६ जुलै रोजी रात्री ८.३३ वाजता सुरू होईल आणि १७ जुलै रोजी रात्री ९.२ वाजता समाप्त होईल.

Ashadhi Ekadashi 2024 Puja At Home
Ashadhi Ekadashi Wishes: 'विठू माउली तू...' आषाढी एकादशी निमित्तम प्रियजनांना पाठवा 'हे' भक्तिपूर्ण शुभेच्छा संदेश!

आषाढी/देवशयनी एकादशीचे महत्त्व

असे मानले जाते की आषाढी एकादशीला उपवास केल्यास मनुष्याला धन, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. या एकादशीचे व्रत केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. या उपवासामुळे भगवान विष्णूची कृपा होते आणि सर्व संकटे दूर होतात.

Ashadhi Ekadashi 2024 Puja At Home
Danka Hrinamacha: ‘डंका… हरीनामाचा’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; 'या' दिवशी होणार प्रदर्शित

विश्वाचे नियंता आणि पालनकर्ते असं भगवान श्री हरी विष्णू यांना मानले जाते. अशा स्थितीत देवशयनी एकादशीनंतर संपूर्ण चार महिने देव योग निद्रामध्ये जातात. या कालावधीला देवाचा निद्राकाळ असेही म्हणतात. असे मानले जाते की भगवान विष्णू झोपी गेल्यानंतर भगवान शिव ब्रह्मांड चालवण्याची जबाबदारी घेतात, म्हणून चातुर्मासाच्या चार महिन्यांत भगवान शिवाची पूजा करणे विशेषतः फलदायी असते.

Ashadhi Ekadashi 2024 Puja At Home
Ashadhi Ekadashi 2024: लाखो वारकऱ्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करा! मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

आपण आषाढी एकादशी का साजरी करतो?

आषाढी एकादशी हि हिंदू महिन्यात आषाढ (जून-जुलै) मध्ये साजरी केली जाते आणि तिचे फार आध्यात्मिक महत्त्व आहे. असा विश्वास आहे की हा दिवस भक्तिभावाने पाळणे आणि विधीवत पूजा, उपवास केल्याने पाप धुऊन मुक्ती (मोक्ष) प्राप्त होते. वर्षातील सर्व (२४) एकादशींला उपवास नाही केला तर आषाढी एकादशीला उपवास केल्यास भाविकांना पुण्य ल;लाभते असते मानले जाते.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. )

logo
marathi.freepressjournal.in