Diwali Eye Care : दिवाळीत डोळ्यांची घ्या काळजी! छोटीशी चूकही पडू शकते महागात; डॉक्टरांचा इशारा

दिवाळीत फटाके फोडणाऱ्यांसोबतच आजूबाजूला उभं राहून पाहणाऱ्यांच्याही डोळ्यांना इजा होऊ शकते. छोटीशी चूकही महागात पडू शकते. डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला.
Diwali Eye Care : दिवाळीत डोळ्यांची घ्या काळजी! छोटीशी चूकही पडू शकते महागात; डॉक्टरांचा इशारा
Diwali Eye Care : दिवाळीत डोळ्यांची घ्या काळजी! छोटीशी चूकही पडू शकते महागात; डॉक्टरांचा इशारा 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : दिवाळी म्हटलं की दिव्यांची सजावट, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी आलीच! लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण फटाके फोडण्याचा आनंद घेतात. मात्र, या उत्साहात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. फटाक्यांमधून उडणारी ठिणगी, राख किंवा लहान कण डोळ्यांत गेल्यास गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. काही वेळा या दुखापतींमुळे दृष्टीवर कायमस्वरूपी परिणामही होऊ शकतो. त्यामुळे दिवाळीत फटाके फोडताना डोळ्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

डॉ. अग्रवालस् आय हॉस्पिटलच्या चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर आणि हेड ऑफ क्लिनिकल सर्व्हिसेस डॉ. वंदना जैन यांनी फटाक्यांमुळे डोळ्यांना होणाऱ्या दुखापतींबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या सांगण्यानुसार, फटाक्यांमुळे डोळ्यांना किरकोळ जळजळ किंवा भाजण्यापासून ते दृष्टीवर कायमस्वरूपी परिणाम करणाऱ्या गंभीर दुखापती होऊ शकतात. त्यामुळे फटाके फोडताना मुलांवर प्रौढांनी लक्ष ठेवणं, मोकळ्या जागेतच फटाके फोडणं आणि सुरक्षित अंतर राखणं आवश्यक आहे.

फटाक्यांमुळे डोळ्यांना कोणत्या प्रकारच्या दुखापती होऊ शकतात?

फटाक्यांची छोटीशी ठिणगी किंवा त्यातून उडणारा कणदेखील डोळ्यांना गंभीर इजा पोहोचवू शकतो. विशेष म्हणजे, फटाके फोडणाऱ्या व्यक्तींसोबतच आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनाही याचा धोका असतो. दिवाळीत पुढील प्रकारच्या दुखापती होऊ शकतात.

  • कॉर्नियावर ओरखडे : फटाक्यांचे कण, राख किंवा ठिणग्या डोळ्यांच्या पारदर्शक बाह्य पटलावर म्हणजेच कॉर्नियावर आदळल्यास ओरखडे येऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांत वेदना, लालसरपणा, पाणी येणं आणि प्रकाश सहन न होणं अशी लक्षणं दिसू शकतात.

  • डोळ्याचा गोळा फुटणे : फटाक्यांच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र दाबाचा डोळ्याच्या आतील भागावर परिणाम होऊन गंभीर दुखापत होऊ शकते.

  • भाजल्यामुळे होणारी इजा : गरम ठिणग्या किंवा ज्वाळांमुळे पापण्या, पापण्यांचे केस आणि डोळ्यांच्या पृष्ठभागाला भाजू शकतं.

  • कंजंक्टिव्हाला इजा : डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर असलेल्या पातळ पडद्याला उष्णता किंवा रासायनिक पदार्थांमुळे इजा होऊ शकते.

  • डोळ्यांत बाह्य कण जाणे : धूळ, राख किंवा फटाक्यांचे अवशेष डोळ्यांत गेल्यास जळजळ आणि इतर त्रास होऊ शकतो.

  • डोळ्याच्या आतील रक्तस्राव : स्फोटाच्या धक्क्यामुळे डोळ्यांतील नाजूक रक्तवाहिन्यांना इजा होऊन रक्तस्राव होऊ शकतो.

Diwali Eye Care : दिवाळीत डोळ्यांची घ्या काळजी! छोटीशी चूकही पडू शकते महागात; डॉक्टरांचा इशारा
Eye Care Tips : सकाळी उठताच डोळे सुजतात? दुर्लक्ष करू नका; 'ही' ५ कारणं असू शकतात जबाबदार
  • रेटिनाला इजा : फटाक्यांच्या तीव्र स्फोटामुळे रेटिनाला नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे दृष्टी धूसर होऊ शकते किंवा कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

  • रासायनिक दुखापत : फटाक्यांमधील रासायनिक पदार्थ डोळ्यांच्या संपर्कात आल्यास जळजळ किंवा भाजण्याची इजा होऊ शकते.

दिवाळीत डोळ्यांच्या दुखापती टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

फटाके फोडताना थोडीशी काळजी घेतल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात. त्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

  • फटाके नेहमी मोकळ्या जागेतच फोडावेत आणि इतरांपासून सुरक्षित अंतर राखावं.

  • फटाके पेटवताना ते चेहऱ्याजवळ धरू नयेत किंवा त्यांच्यावर वाकून पाहू नये.

  • फटाके पाहताना किमान पाच मीटर अंतर ठेवावं.

  • फटाके फोडण्यापूर्वी कॉन्टॅक्ट लेन्स काढून ठेवाव्यात.

  • फटाके फोडताना सिंथेटिक कपडे घालणं टाळावं आणि योग्य पादत्राणांचा वापर करावा.

  • फटाके हाताळल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत आणि चेहरा व डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.

  • वापरलेले फटाके फेकून देण्यापूर्वी पाण्याच्या बादलीत भिजवून पूर्णपणे निष्क्रिय करावेत.

  • फटाके बंद पेटीत आणि लहान मुलांच्या आवाक्याबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.

  • न फुटलेला फटाका पुन्हा पेटवण्याचा किंवा हाताळण्याचा प्रयत्न करू नये.

  • अपघाताने आग लागल्यास वापरण्यासाठी पाणी आणि वाळूची बादली जवळ ठेवावी.

  • लहान मुलांना प्रौढांच्या देखरेखीशिवाय फटाके फोडू देऊ नयेत.

फटाक्यांमुळे डोळ्यांना दुखापत झाल्यास काय कराल?

फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा झाल्यास घरगुती उपाय करण्यापेक्षा तातडीने वैद्यकीय मदत घेणं महत्त्वाचं आहे. दुखापतीच्या स्वरूपानुसार पुढील काळजी घ्यावी.

  • धूर, धूळ किंवा राखेमुळे डोळ्यांना जळजळ होत असल्यास डोळे चोळू नयेत. स्वच्छ पाण्याने किमान २० मिनिटे डोळे धुवावेत.

  • हात स्वच्छ धुतल्याशिवाय डोळ्यांना स्पर्श करू नये.

  • डोळ्यांत गेलेले कण किंवा बाह्य वस्तू स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नये.

Diwali Eye Care : दिवाळीत डोळ्यांची घ्या काळजी! छोटीशी चूकही पडू शकते महागात; डॉक्टरांचा इशारा
Home Cleaning Tips : मुलांनी भिंती रंगवल्यात? डाग काढण्यासाठी वापरा 'या' सोप्या ट्रिक्स; पुन्हा पेंट करण्याची गरज पडणार नाही
Diwali Eye Care : दिवाळीत डोळ्यांची घ्या काळजी! छोटीशी चूकही पडू शकते महागात; डॉक्टरांचा इशारा
दिवाळीत सुंदर दिसायचंय? आजपासूनच सुरू करा ३ गोष्टी; चेहरा, केस आणि फिटनेससाठी ऋजुता दिवेकरांनी सांगितला सोपा मार्ग
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही मलम, आय ड्रॉप्स किंवा घरगुती उपाय वापरू नयेत.

  • डोळ्यांत काहीतरी घुसल्याची किंवा डोळ्याला छेद झाल्याची शंका असल्यास डोळे धुवू नयेत किंवा त्यावर दाब देऊ नये. डोळ्यावर दाब न देता कठीण संरक्षक कवच ठेवून तातडीने आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्यावी.

दुखापत किरकोळ वाटली तरी दुर्लक्ष करू नका!

फटाक्यांच्या अपघातानंतर डोळ्यांत वेदना, लालसरपणा, धूसर दिसणं, प्रकाश सहन न होणं किंवा सतत पाणी येणं अशी लक्षणं दिसल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. दुखापत किरकोळ वाटत असली किंवा सुरुवातीला दृष्टी सामान्य असली, तरी वैद्यकीय तपासणी करण्यास विलंब करू नये. त्यामुळे दिवाळीचा आनंद घेताना स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या डोळ्यांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष द्या.