सुंदर दिसण्यासाठी 'टोमॅटो' आणि 'बटाट्या'चा करा उपाय

सुंदर दिसण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच उपाय करू शकता. भाजीची चव वाढवणाऱ्या टोमॅटो आणि बटाट्याने देखील तुम्ही सुंदर दिसू शकता.
सुंदर दिसण्यासाठी 'टोमॅटो' आणि 'बटाट्या'चा करा उपाय
Published on

त्वचेचा रंग खुलण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी अनेकजण महागड्या सौंदर्य प्रसाधनांवर किंवा पार्लरमध्ये अमाप खर्च करतात तसेच जाहिराती पाहून बाजारातून विविध क्रिम विकत घेऊन त्या वापरतात. मात्र अशा केमिकल्सयुक्त क्रिममुळे चेहऱ्याचे अधीकच नुकसान होऊ शकते.

चेहरा गोरा दिसण्यासाठी काय करावे, कोणती क्रीम वापरावी असे अनेकांचे प्रश्न असतात. सुंदर दिसण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच उपाय करू शकता. भाजीची चव वाढवणाऱ्या टोमॅटो आणि बटाट्याने देखील तुम्ही सुंदर दिसू शकता. तर किचनमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीही चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास, चेहरा गोरा करण्यास मदत करतात.

टोमॅटो : दररोज एक सुंदर दिसण्यासाठी टोमॅटो आणि बटाट्याचा उपाय टोमॅटो खाल्ल्याने चेहरा चमकदार होतो. टोमॅटोचा रस नियमित २० मिनिटं चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळण्यास मदत होते. तेलकट त्वचा असलेल्या स्त्रियांनी टोमॅटोच्या रसात थोडं मध टाकून चेहऱ्यावर लावावा.

बटाटा : बटाट्याने चेहऱ्यावरचे काळे डाग जाण्यास मदत होते. रोज बटाट्याचा एक तुकडा चेहऱ्यावर ५ मिनिटं घासल्याने चेहऱ्यावरचे काळे डाग जातात. बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळतो.

पपईचा गर : पपईचा गर चेहऱ्यावर लावा व सुकेपर्यंत तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे चेहऱ्याचे तेज वाढून चेहरा चमकदार व गोरा होण्यास मदत होते.

कोरपडीचा गर : कोरफडीचा गर (अ‍ॅलोव्हेरा जेल) चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूप उपयुक्त ठरते. कोरफडीचा गर चेहऱ्यावर किमान अर्धा तास लावल्यास चेहरा गोरा, स्वच्छ आणि हायड्रेट होण्यास मदत होते. अर्धा तास झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.

अंड्याचा पांढरा भाग :

अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर आणि काळ्या डागावर लावावा. 15 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याची त्वचा क्लीन होऊन काळे डाग देखील कमी होण्यास मदत होते.

logo
marathi.freepressjournal.in