कोरड्या त्वचेवर 'हे' करा घरगुुती उपाय

ज्यामुळे चेहऱ्यावर बारीक रेषा आणि त्वचेवर सुरकूत्या येऊ लागतात. पण काळजी करण्याचं कारण नाही, त्वचा पुन्हा कोमल आणि चमकदार बनवण्यासाठी घरगुती उपायही खूप फायदेशीर ठरतात.
कोरड्या त्वचेवर 'हे' करा घरगुुती उपाय

त्वचा सुंदर, आणि निरोगी असावी प्रत्येकालाच वाटतं पण, प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार हा वेगळा असतो. काहींची त्वचाही तेलकट असते काहींची कोरडी असते काहींची नॉर्मल. त्यामुळे साहजिक आहे की, प्रत्येक त्वचेची काळजीही वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. आवश्यक प्रमाणात पाणी न प्यायल्यास ही त्वचा कोरडी होते. ज्यामुळे चेहऱ्यावर बारीक रेषा आणि त्वचेवर सुरकूत्या येऊ लागतात. पण काळजी करण्याचं कारण नाही, त्वचा पुन्हा कोमल आणि चमकदार बनवण्यासाठी घरगुती उपायही खूप फायदेशीर ठरतात

1. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर गरम पाण्याने आंघोळ करणं टाळा. जास्त काळ पाण्यात राहिल्याने किंवा पावसात भिजल्यानेही त्वचा कोरडी होते. त्यामुळे दररोज फक्त 5 ते 10 मिनिटं आंघोळ करा.


2. मॉइश्चराईजरचा वापर तर कराच पण त्यासोबतच सौम्य क्लींजर किंवा शॉवर जेलचाही वापर करा. हार्ड क्लींजरऐवजी अनसेंटेड आणि माईल्ड सोप क्लींजरचाही वापर करा.


3. जेव्हा तुमची त्वचा ओली असेल तेव्हा मॉईश्चराईजर लावा. आंघोळ केल्यानंतर नेहमी त्वचा हळूवार पुसा. तुमच्या त्वचेतील ओलावा कायम राहण्यासाठी आंघोळ केल्यावर तीन ते पाच मिनटाच्या आत मॉईश्चराईजर लावा.


4. तुमचा चेहरा दिवसातून वारंवार धुवू नका. शक्य असल्यास फक्त रात्री चेहरा धुवा. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील दिवसभरातील धूळ निघून जाईल आणि त्वचा कोरडीही पडणार नाही.


5. ओठांसाठी चांगल्या लिपबामचा वापर करा. त्या लिपबाममध्ये पेट्रोलटम, पेट्रोलिअम जेली आणि मिनरल ऑईल असलं पाहिजे.


6. थंडीच्या काळात बाहेरील थंड वातावरणाशी संपर्क टाळण्यासाठी चेहरा नेहमी स्कार्फने झाकून घ्या. पण लक्षात घ्या तुमच्या त्वचेला स्कार्फच्या कापडाचा आणि ते वापरण्यासाठी वापरलेल्या डिटर्जंटचाही त्रास होऊ शकतो.

कोरड्या त्वचेसाठी घरगुती फेसमास्क

फेस मास्क आणि घरगुती फेसपॅक वापरल्याने त्वचा स्वच्छ होते आणि डेड स्कीनही काढून टाकतात. यामुळे त्वचा स्वच्छ, मुलायम आणि तरूण दिसते आणि रक्तसंचारही वाढतो. फेसमास्क हे अनेक प्रकारचे असतात जे त्वचेच्या प्रकारामुळे आणि ऋतूप्रमाणे लावले जातात. आजकाल फळांचे आणि भाज्यांचे फेसमास्क प्रचलित आहेत. पाहूया घरच्याघरी कोरड्या त्वचेसाठी बनवता येणारे काही फेसमास्क.

1. मिल्की वे फेस मास्क

दूधातील मॉईश्चरायजिंग घटकांचा फायदा घ्या. दूधामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडंट्स, व्हिटॅमीन बी, प्रोटीन्स आणि मिनरल्स असतात. या मास्कसाठी 7 ते 8 भिजवलेले बदामाचा वापर करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर वाटलेले बदाम 3 चमचा कच्च्या दूधात मिक्स करून चेहऱ्यावर लावा. हे आठवड्यातून तीनदा केल्यास त्वचा मऊ आणि मुलायम होते.

2. कमालीचं केळं

केळ + ऑलिव्ह ऑईल + मध = सुंदर त्वचा! या होममेड फेशियलसाठी केळं कुस्करून त्यात 2 चमचे ऑलिव्ह ऑईल आणि किंचित मध घाला. केळ हे तुमच्या त्वचेला मॉईश्चराईज करतं आणि मध ते मॉईश्चर लॉक करतं. आठवड्यातून दोनदा तुमच्या चेहऱ्यावर वापरल्यास त्वचेवर जणू जादूच होईल.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in