चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय, त्वचेवर येईल नैसर्गिक चमक

वाढत्या वयासोबत त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या येतात. सुरकुत्यांना कमी करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय, त्वचेवर येईल नैसर्गिक चमक

वाढत्या वयासोबत त्वचेवर सुरकुत्या दिसायला लागतात या सुरुकुत्यांची समस्या कमी करण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय अवलंबवा. घरगुती उपाय केल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. तसेच सुरकुत्यांची समस्या ही दूर होते. 

कोरफड जेल-

कोरफड जेल त्वचेसाठी लाभदायक मानले जाते या मध्ये विटामिन सी, विटामिन ई सोबतच इतर पोषक घटक असतात. जे तुमच्या त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. कोरफडला त्वचेवर लावल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहतो. सुरकुत्या कमी होण्यासाठी दररोज एलोवेरा जेलने चेहऱ्यावर मसाज करू शकता. 

PM

ऑलिव्ह ऑईल-

ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्यामुळे त्वचेसंबंधित समस्या कमी होतात. हे तेल अँटीऑक्सीडेंट गुणांनी भरपूर असते. सुरकुत्यांपासून आराम मिळण्यासाठी चेहऱ्यावर ऑलिव्ह आईलने मसाज करा. काही वेळानंतर चेहरा धुवून टाका.  

 तेल : ऑलिव्ह, शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल गरम करुन कानात टाकणे हा देखील सोपा उपाय आहे. तेलात जरासं लसूण टाकला तरी चालतो. यामुळे मळ बाहेर पडतो.
तेल : ऑलिव्ह, शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल गरम करुन कानात टाकणे हा देखील सोपा उपाय आहे. तेलात जरासं लसूण टाकला तरी चालतो. यामुळे मळ बाहेर पडतो.PM

दही-

दहीमध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते जे त्वचेला एक्सफोलिएट करायला मदत करते. तुम्ही दह्याने चेहऱ्यावर मसाज करा व थोडया वेळाने चेहरा पाण्याने धुवून टाका. 

PM

नारळाचे तेल-

नारळाच्या तेलात फॅटी अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते. जे तुमच्या त्वचेला पोषण देण्यास मदत करते. झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर नारळाच्या तेलाने मसाज केल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 

PM

मध -

मध अँटीऑक्सीडेंट गुणांनी परिपूर्ण असते सोबतच हे त्वचेसाठी उपयोगी असते. सुरकुत्यांपासून मुक्तता हवी असल्यास तर चेहऱ्यावर मध लावून मसाज करा नंतर हे चेहऱ्यावर 20-30 मिनिट तसेच राहू द्या व नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका

PM

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in