बदलत्या ऋतुमानामुळे वारंवार आजारी पडताय? 'हा' काढा प्यायल्याने वाढते रोगप्रतिकारक शक्ती

हळदीत औषधी गुणधर्म असल्याने शरीरातील रोगप्रतीकार शक्ती वाढते, जाणुन घ्या हळद आणि दुधाचा काढा बनवण्याची पध्दत.
बदलत्या ऋतुमानामुळे वारंवार आजारी पडताय? 'हा' काढा प्यायल्याने वाढते रोगप्रतिकारक शक्ती

ऋतुमानात बदल झाला की त्यानुसार सर्दी, खोकला, ताप व साथीचे आजार होत असतात. त्याचा लगेचच परीणाम जर तुमच्यावर होत असेल तर त्याला मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी असणं. शरीरात नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी व टिकवण्यासाठी  रोजची दिनचर्या फार महत्वाची आहे. तुम्ही काय खाता, कधी खाता, किती खाता, व्यायाम करता का? तसेच रोज पुरेसं पाणी पिता की नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची झोप योग्य वेळी व पुरेशी होते कि नाही. तुम्ही धुम्रपान करत का? अश्या अनेक गोष्टींवर आपली रोग प्रतिकार शक्ती अवलंबून असते.  

खरंतर रोजच्या आहारात कडू, आंबट, तुरट, खारट, तिखट व गोड पदार्थ असतील तर अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. रोगप्रतिकार शक्ती ही आपोआपच वाढते.

आयुर्वेदा नुसार औषधी घटक असणाऱ्या वनस्पती एकत्र पाण्यात उकळवून काढा बनवला तर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. हळद आणि दुधाच्या काढ्यापासून व्हायरलमुळे होणारा त्रास कमी होतो. हळदीत औषधी गुणधर्म असल्याने शरीरातील रोगप्रतीकार शक्ती वाढते, जाणुन घ्या हळद आणि दुधाचा काढा बनवण्याची पध्दत.

१)   हळदीचं दूध साहित्य : 
१ कप पाणी, १ कप दूध, पाव चमचा हळद, खडी साखर किंवा शुध्द गूळ चवीनुसार

गुणधर्म : ह्या काढ्यात आपण विविध औषधींचा वापर करणार आहोत त्यांचे गुणधर्म आपण पाहूया. 

हळद ही औषधी वनस्पती आहे. सर्दी, खोकला, घश्यातील इन्फेक्शन कमी करण्यासाठी उत्तम आहे. हळदीमुळे शरीरातील वात, पित्त व कफ यांच संतुलन ठेवण्यास मदत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते, हळदीमधील कर्क्युमिन मुळे ह्रदय रोग, अल्झायमर व कर्क रोगाला आळा घाण्यास प्रभावी आहे. लिव्हर मधील विषद्रव्य बाहेर काढले जातात. (डिटॉक्सिफिकेशन होते.), हळद ही जखम बरी करण्यासाठी व वेदना कमी करण्यासाठी खूपच उपयोगी आहे. या सर्व गुणधर्मान मुळेच कदाचित हळदीला हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी व सौभाग्य लेणं म्हणून फार महत्व आहे. 

दूध हे कॅल्शिम व विविध खनिजांनी युक्त आहे. दुधामुळे दात व हाडे बळकट होतात. वजन कमी करण्यास मदत होते. त्वचा चांगली होते.

खडीसाखर ही खोकल्यावर उत्तम औषधी आहे. खडीसाखरेचे सेवन केल्याने हिमग्लोबिनचे प्रमाण वाढते. थकवा दूर करण्यासाठी व झटपट एनर्जी मिळवण्यासाठी खडीसाखर खुपच उपयुक्त आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

गूळ हा उष्ण पादार्थ असल्यामुळे ऊर्जा उत्पन्न होते. भरपूर लोहयुक्त पदार्थ. झटपट एनर्जी मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणून आजही खेडेगावात उन्हा मधून किंवा बाहेरून कोणी आले तर गूळ व पाणी देतात. 

कृती : आधी पाणी व दूध एकत्र उकळवत ठेवावे. उकळी आली की त्यात हळद घालावी हळदयुक्त दूध एक दोन मिनिट उचळु द्यावे नंतर त्यात चवी नुसार खडी साखर किंवा गूळ घालावा (खडीसाखर किंवा गुळाची पावडर वापरली तरी चालेल). हे दूध एक कप होई पर्यंत आटवावे. हे दूध गाळून कपात/ग्लास मध्ये  ओतावे.  

हे तयार झालेले दूध गरम असतानाच घोट घोट प्यावे. हा उपाय दिवसभरात कधीही करून चालतो. ज्यांना मधुमेह आहे अश्या व्यक्तींनी साखर वापरू नये.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in