तुम्हालाही आवडतो फक्त दुधाचा चहा? जाणून घ्या दुष्परिणाम

दुधाचा चहा हे भारतातील लोकप्रिय पेय आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही. त्यातही आपल्याकडे दुधाचा चहा पिण्याचे प्रमाण जास्त आहे. तर काहींना फक्त दुधाचा चहा आवडतो. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का फक्त दुधाचा चहा पिल्याने आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात. चला जाणून घेऊया दुधाच्या चहाचे दुष्परिणाम आणि काय आहे उत्तम पर्याय.
तुम्हालाही आवडतो फक्त दुधाचा चहा? जाणून घ्या दुष्परिणाम
Freepik
Published on

दुधाचा चहा हे भारतातील लोकप्रिय पेय आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही. त्यातही आपल्याकडे दुधाचा चहा पिण्याचे प्रमाण जास्त आहे. तर काहींना फक्त दुधाचा चहा आवडतो. मात्र, तुम्हाला हे माहित आहे का फक्त दुधाचा चहा पिल्याने आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात. चला जाणून घेऊया दुधाच्या चहाचे दुष्परिणाम आणि काय आहे उत्तम पर्याय.

पित्त वाढणे

फक्त दुधाचा चहा पिल्याने शरीरात पित्ताचे प्रमाण वाढत जाते. पित्ताचे प्रमाण वाढल्याने अनेक प्रकारचे त्रास उद्भवतात. तुमच्या शरीरात जर पित्ताचे प्रमाण वाढत असेल तर ते फक्त दुधाचा चहा पिल्यामुळे असू शकते. शरीरात पित्ताचे प्रमाण वाढल्यामुळे डोकेदुखी, अपचन, मळमळ, पोटफुगी असे आजार होऊ शकतात.

उष्णता वाढते

दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा पिल्याने कफ-पित्त वाढते. याशिवाय पोटातील उष्णतेचे प्रमाणही वाढते. पोटात उष्णता वाढल्यामुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात.

बद्धकोष्ठता

चहा बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न पिल्यास शौचाला होत नाही. मात्र, हा सवयीचा परिणाम असतो. शौचाचा वेग निर्माण करण्याचे काम चहा करत नाही. उलट यामुळे रक्तातील आम्लता वाढते.

चहासोबत मीठयुक्त खाद्यपदार्थ खाणे खूप घातक

अनेक वेळा आपण चहासोबत वेगवगळे पदार्थ खातो. यामध्ये चहा-चपाती, चहा-बिस्किट किंवा चहासोबत बेकरीचे पदार्थ खातो. मात्र, लक्षात घ्या तुम्ही नुसता दुधाचा चहा पित आहात. त्यामुळे चहासोबत खाणाऱ्या पदार्थांमध्ये जर मीठ असेल तर हे शरीरासाठी प्रचंड घातक असते. यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात.

आरोग्यदायी चहा कसा बनवावा?

चहा पिण्याची योग्य पद्धत ही काळा किंवा कोरा चहा ही असते. मात्र, तुम्हाला जर दुधाचा चहा प्यायचाच असेल तर ७० टक्के पाणी आणि ३० टक्के दूध म्हणजे साधारण पाऊण कप पाणी आणि पाव कप दूध असे प्रमाण असावे. तसेच साखर ही खूप कमी घालावी. अन्यथा मळमळ होऊ शकते. आलं किंवा सुंठ पाण्यात उकळून घ्यावी नंतर चहाची भुकटी किंवा पावडर आणि साखर घालून उकळावे आणि सरते शेवटी दूध घालून उकळावे. ही चहा बनवण्याची योग्य पद्धत आहे.

चहा किती प्रमाणात घ्यावा?

कमी दुधाचा किंवा अगदी कोरा (काळा) चहा घेतला तरी तो दिवसातून मोजून दोन कप घ्यावा. जर तुमचे शारीरिक श्रम खूप जास्त असेल तर तुम्ही जास्तीत जास्त ३ ते ४ छोटे कप चहा पिऊ शकता. मात्र, यापेक्षा जास्त चहा पिल्याने त्याचे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकता

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)

logo
marathi.freepressjournal.in