
उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात सातत्याने गार आणि थंड पदार्थ किंवा पेय घ्यावेसे वाटतात. तसेच उन्हाळ्यामुळे आपण सातत्याने फ्रिजमधील पाणी पितो. उन्हाळ्यात फ्रिजचे पाणी प्यावेसे वाटणे हे खूप साहजिक आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का अशा प्रकारे उन्हाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी पिणे आरोग्यासाठी किती घातक आहे. या सवयीमुळे तुम्हाला वेगवेगळे आजार जडू शकतात. जाणून घ्या फ्रिजमधील पाणी पिण्याचे काय आहेत तोटे...
सर्दी-खोकला होऊ शकतो
उन्हाळ्यात सातत्याने फ्रिजमधील पाणी पिणे हे सर्दी आणि खोकल्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. फ्रिजचे पाणी हे मोठ्या प्रमाणात थंड असते. उन्हातून आल्यानंतर तुम्ही थेट फ्रीजमधील थंड पाणी पित असाल तर उष्ण आणि थंड अशा एकत्रित परिणामामुळे सर्दी खोकला होऊ शकतो.
घसा बसणे
फ्रिजमधील गार पाणी वारंवार प्यायल्याने घसा बसण्याचा त्रास होऊ शकतो. यामुळे घशाला सूज येणे, घसा दुखणे असा त्रास होऊ शकतो.
ताप येणे
उन्हामुळे शरीराचे तापमान अनेकदा वाढलेले असते. अशा परिस्थितीत तुम्ही जर उन्हातून आल्यानंतर थेट फ्रिजमधील पाणी पित असाल तर सर्दी-खोकला याच्या जोडीला ताप येण्याची शक्यताही अधिक असते.
पचन संस्थेवर परिणाम
फ्रिजमधील पाणी हे पचनासाठी जड असते. परिणामी पचनसंस्थेवर याचे परिणाम होते. तुमची पचनशक्ती मंद होण्याची शक्यता असते. पचन मंद झाल्याने बद्धकोष्ठ, गॅस अशा समस्या उद्भवू शकतात.
वजन वाढते
पचन संस्थेवर परिणाम झाल्याने शरीरातील फॅट्स अधिक कडक होतात. यामुळे चरबी कमी करण्यात अडथळे निर्माण होतात. अन्न व्यवस्थित न पचल्याने शरीरात चरबीसह विषारी द्रव्य वाढीस लागते. परिणामी वजन वाढते.
डोकेदुखी होऊ शकते
फ्रिजमधील थंड पाणी पिण्यासाठी चांगले वाटते. मात्र, उष्णता आणि थंड दोन्ही गोष्टी एकत्र झाल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)