जवळपास प्रत्येकाच्याच दिवसाची सुरुवात ही चहाने होते. चहा लोकांच्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकदा चहा शरीरासाठी हानिकार असल्याचं सांगत चहा न पिण्याचा सल्ला दिला जातो. पण, तुम्हाला चहा पावडरचे फायदे माहीती आहेत का? चला तर मग जाणून घेऊया चहाचे काही असे फायदे जे तुम्हाला करतील थक्क.
निर्जंतुकीकरण करणेः चहा केल्यानंतर चहा पावडर फेकून देण्याऐवजी, उरलेली पावडर एका भांड्यात काढा आणि स्वच्छ धुवून घ्या. धुतलेली पावडर गरम पाण्यात उकळून घ्या, उकळलेला चहा कपड्याने गाळून घ्या. त्या पाण्याने टेबल, खुर्ची, घरातल्या वस्तू पूसल्याने निर्जंतुकीरण होते व लाकडी वस्तूंना चमक येते.
केसांची चमक वाढवण्यासाठी
केस चमकदार व्हावेत यासाठी ग्रीन टी चा वापर केला जातो. त्यासाठी ग्रीन टीच्या तीन बॅग उकळत्या पाण्यात टाका. पाणी थंड झाल्यावर टी बॅग काढून घ्याव्या आणि त्या पाण्याने केस धुवून घ्या. केस गडद होण्यासाठी ग्रीन टीऐवजी ब्लॅक टीचा वापर करावा.
डोळ्यांवरील सूज घालवण्यासाठी
सुजलेले डोळे टी बॅग तुमची समस्या दूर करू शकतात. त्यासाठी डोळे बंद करून टी बॅग डोळ्यांवर १० मिनिटं ठेवा. त्यानंतर तुम्हाला झालेला बदल जाणवेल.
आपल्यासोबत गुलाबाच्या फुलांचं सौंदर्य वाढवण्यासाठी
चहाच्या पानांमध्ये असलेलं विशिष्ट प्रकारचे टॅनिक ॲसिड गुलाबाच्या फुलांचे सौंदर्य आणि रंग वाढवण्यास मदत करतं. त्यासाठी वापरलेल्या टी बॅग फाडून गुलाबाच्या झाडाच्या मुळाशी पसरवावी.
पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी
जर दिवसभर काम करून तुमच्या पायांना दुर्गंध येत असेल किंवा पायाच्या स्कीनची समस्या असेल तर टी बॅगचा वापर करू शकता. त्यासाठी कोमट पाण्यात टी बॅग टाकून त्या पाण्यात पाय भिजवा. त्यामुळे पायांची दुर्गंधी तर जाईलच, पण त्याचसोबत पायदेखील मऊ होतात.
Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.