गुढी पाडवा साजरा करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; जाणून घ्या काय करावे आणि काय करू नये?

हिंदू कालगणनेनुसार रविवारपासून (दि.30) नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. हिंदू कालगणना ही चांद्रसौर कालगणना आहे. चंद्राच्या कलांनुसार तिथींना या कालगणनेत महत्त्व असते. त्यामुळे या कालगणनेतील अमांत पद्धतीनुसार चैत्र महिन्याची शुक्ल पक्षातील पहिल्या तिथीला नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढी पाडवा पारंपारिक पद्धतीने साजरा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
गुढी पाडवा साजरा करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; जाणून घ्या काय करावे आणि काय करू नये?
Freepik
Published on

हिंदू कालगणनेनुसार रविवारपासून (दि.30) नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. हिंदू कालगणना ही चांद्रसौर कालगणना आहे. चंद्राच्या कलांनुसार तिथींना या कालगणनेत महत्त्व असते. त्यामुळे या कालगणनेतील अमांत पद्धतीनुसार चैत्र महिन्याची शुक्ल पक्षातील पहिल्या तिथीला नवीन वर्षाची सुरुवात होते. हा दिवस गुढी पाडवा या नावाने साजरा केला जातो. प्रामुख्याने महाराष्ट्रात गुढी उभारून हा दिवस साजरा करण्यात येतो. गुढी पाडवा पारंपारिक पद्धतीने साजरा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

गुढी उभारण्यापूर्वी घरात काय तयारी करावी?

गुढी उभारण्यापूर्वी संपूर्ण घर छान स्वच्छ करून घ्यावे. गुढी जिथे उभारणार आहात त्या ठिकाणी जवळच सुरेख रांगोळी काढावी. रांगोळी काढणे हे मांगल्याचे प्रतिक आणि स्वागत करण्याची सर्वोत्तम पद्धत असते. दाराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे छान तोरण बांधा. गुढी उभारण्यासाठीचे सर्व साहित्य स्वच्छ धुतलेले किंवा नवीन असतील याची काळजी घ्या.

गुढी कशी उभारावी?

पारंपारिक पद्धतीने गुढी उभारताना बांबूच्या काठीचा उपयोग करावा. त्यावर रेशमी वस्त्र, झेंडूंच्या फुलांचे हार, गाठीचे हार, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पानं योग्य पद्धतीने बांधावी. हे सर्व बांधताना विशेष काळजी घ्यावी. जेणेकरून दुसऱ्या दिवशी पर्यंत हे निसटणार नाही. त्यावर चांदीचे किंवा तांब्याचे कलश उलटे ठेवावे.

कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

गुढी पाडव्यासाठी गुढी उभारताना कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून ठेवलेली असावी. कारण गुढी उभारताना कडुलिंबाच्या पानांना विशेष महत्त्व असते.

गुढी उभारताना जो कलश ठेवणार असाल त्या कलशावर कुंकूने छान स्वस्तिक रेखाटावे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतिक आहे. स्वस्तिक हे शुभ कार्याची सुरुवात करावी हा संदेश देत. स्वस्तिक काढताना लक्ष ठेवावे ते सरळ आणि योग्य पद्धतीने काढावे. चुकूनही उलटे किंवा चुकीचे स्वस्तिक काढू नये.

गुढी पाडव्याच्या दिवशी काय करावे?

  • गुढी पाडव्याच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने ब्रह्म मुहूर्तावर उठून मंगल स्नान करावे. स्नानासाठी सुगंधी उटण्याचा वापर करावा.

  • गुढी पाडव्याच्या दिवशी नवीन वस्त्र परिधान करावे. तुमच्याकडे नवीन वस्त्र नसेल तर स्वच्छ धुवून ठेवलेले नवीन वस्त्र परिधान करावे.

  • गुढी पावड्याच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने स्वयंपाक करावा.

  • गुढी उभारल्यानंतर कडुलिंबाची कोवळी पाने आणि खडीसाखरेचा प्रसाद चावून चावून अवश्य खावा. यामुळे आरोग्य सुधारते.

  • गुढी उभारल्यानंतर नवीन वर्षात एखादा चांगला नवीन संकल्प करावा आणि तो पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्याची शपथ घ्यावी.

गुढी पाडव्याच्या दिवशी काय करू नये?

  • गुढी पाडव्याला दिवसा झोपू नये.

  • गुढी पाडव्याला मांसाहार वर्ज्य करावा.

  • गुढी पाडव्याला नखे, केस कापू नये.

  • गुढी पाडव्याला कोणालाही अशुभ तसेच अपशब्द बोलू नये.

  • गुढी पाडव्याला कोणालाही दुषणे देऊ नये.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in