
अनेक वेळा काम तणाव आणि अन्य अनेक कारणामुळे आपला मूड खराब होतो. मूड खराब झाल्यानंतर खूप उदासवाणे वाटते. काहीच करावेसे वाटत नाही. नकारात्मक विचारांनी आपण घेरले जातो. अशा वेळी मूड ठीक करण्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबण्याचा अनेकजण सल्ला देतात. त्यातच काही जण आईस्क्रीम खाल्ल्याने मूड ठीक होतो असे म्हणतात. चला जाणून घेऊ या आईस्क्रीम खाल्ल्यानंतर खरंच मूड ठीक होतो का? काय आहे यामागील कारणे आणि किती प्रमाणात आईस्क्रीम खायला हवे?
आईस्क्रीम खाल्ल्यानं खरंच मूड ठीक होतो
आईस्क्रीममध्ये गोड घटक असतात. तसेच आईस्क्रीम हे दुधापासून बनलेले असते. हे दोन्हीही पदार्थ आनंदनिर्मितीसाठी लागणारे हार्मोन्स डोपामाइन आणि सेरोटोनिनला स्रवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आईस्क्रीम खाल्यानंतर आपल्याला लगेचच शांत वाटायला लागते. थोडा वेळाने मनात आनंदी वाटायला लागते. त्यामुळे मूड चांगला होतो.
आईस्क्रीम खाण्याचे अन्य फायदे
तणाव कमी होतो
आईस्क्रीम खाण्याने तणाव कमी होतो. डोपाइन आणि सेरोटोनिन हे आनंद निर्मिती करणारे हार्मोन सक्रिय झाल्याने मूड ठीक होतो. त्यामुळे तणाव कमी होतो.
कार्यक्षमता वाढते
मन आनंदी झाल्याने आणि मनावरचा तणाव कमी झाल्याने आपली कार्यक्षमता वाढते. आपण पूर्वीपेक्षा अधिक कुशलतेने काम करते.
ऊर्जा प्रदान करते
आईस्क्रीममुळे अधिकची ऊर्जा मिळते. त्यामुळे आपल्याला ताजेतवाने आणि ऊर्जावान वाटते.
आईस्क्रीम किती आणि कधी खावे?
आईस्क्रीम सामान्यपणे जेवणानंतर दोन तासाने खावे. तसेच जेव्हा मूड ऑफ असेल तेव्हा आईस्क्रीम खाल्ले तरी चालते. मात्र, आईस्क्रीम खाण्याचे प्रमाण जास्त असू नये. कारण यात साखर असते तसेच दुधातील फॅट असतात. परिणामी जास्त प्रमाणात आईस्क्रीम खाल्ल्यास वजन वाढण्याचा धोका असतो. तसेच जेवणानंतर लगेचच आईस्क्रीम खाऊ नये. अन्यथा अपचनाच्या समस्या निर्माण होतात.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)