तरुण वयातच केस पांढरे होतायेत? करा 'हे' घरगुती उपाय

कमी वयात केस पांढरे न होण्यासाठी काय उपाय केले जावेत आणि कोणत्या घरगुती पद्धतीचा वापर करू शकता ते जाणून घेऊया …
तरुण वयातच केस पांढरे होतायेत? करा 'हे' घरगुती उपाय

एका ठराविक वयानंतर केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया झाली. पण जर केस जर अगदी तरुण वयातच पांढरे होत असतील तर तुमच्यासाठी ही चिंतेची बाब ठरते. त्यामुळे कमी वयात केस पांढरे न होण्यासाठी काय उपाय केले जावेत आणि कोणत्या घरगुती पद्धतीचा वापर करू शकता ते जाणून घेऊया …

आपल्या केसांसाठी कांद्याचा रस लावा. कांद्याच्या रसाच्या मदतीने आपले केस पांढरे होण्यापासून दूर  ठेवू शकतात . कांद्याची पेस्ट तयार करून त्याच्यामध्ये काही प्रमाणात लिंबाचा रस टाका . ते सारे मिश्रण एकत्र करून त्याचा वापर हा आपल्या केसासांठी करू शकता. त्याचा वापर कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी करावा. त्यामुळे केस पांढरे होण्याच्या समस्या या दूर होतात. केसांना ज्यावेळी कांद्याचा रस लावू त्यावेळी मात्र थंड पाण्याच्या मदतीने केस धुतले जावेत .

आवळा हा तुरट असल्याने तो खायला कोणालाच आवडत नाही . पण त्याचे खूप सारे फायदे आहेत. केसांच्या वाढीसाठी आणि केसांचा पोत सुधारण्यासाठी आवळा याचा वापर हा केला जावा. आवळा हा आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. आवळ्याची छोटी पेस्ट तयार करू त्याचा वापर केसांसाठी केला असता. केस काळेभोर आणि मजबूत राहण्यास मदत होते. तसेच आवळ्याच्या पेस्टमध्ये बदामाचे तेल घालून त्याच्या मदतीने जर केसांना मसाज केला तर ते फायदेशीर असणार आहे.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in