योगासनं करताय? सकारात्मक परिणामासाठी 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या

योग हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मानवजातीसाठी वरदान आहे. काही गोष्टी पाळल्याने योगाभ्यासाचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.
योगासनं करताय? सकारात्मक परिणामासाठी 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या

आजच्या आधुनिक युगात अनेक जणांना आपले शरीराचे आरोग्या चांगले राहावे यासाठी अनेक उपाय करताना दिसतात. शरीर सुडोल ठेवण्यासाठी व्यायाम शाळा (जिम), झुंबा, एरोबिक्स वगैरे केला जातो. तर कोणी चालणे, पळणे, सायकल चालवणे व पोहणे असे व्यायाम करत असतात. तर काही जण योगासने करतात. योगाचा उपयोग नेहमीच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायद्यांसाठी केला जातो. योग हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मानवजातीसाठी वरदान आहे. पण योगासनाला सुरुवात करायच्या आधी योगासन करताना व योगासन झाल्या नंतर काही गोष्टी या नक्की पाळायला हव्यात. त्यामुळे योगाभ्यासाचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

योगासनं सुरु करायच्या आधी पाळावयाची काही बंधने

योगासन करण्याची वेळ

योगाभ्यासाची उत्तम वेळ म्हणजे पोट रिकाम असेल व शरीर उत्साही असेल अश्या कोणत्याही वेळी योगाभ्यास करणे योग्य असते. योगाभ्यास करताना आज तीस मिनिटं उद्या तास-दीडतास अश्या पद्धतीने योगाभ्यास करू नये. शिवाय आज सकाळी उद्या सायंकाळी अश्याही पद्धतीने योगाभ्यास करू नये. योगाभ्यास करताना दिवसभरातील ठरवलेली वेळ व किती वेळ योगाभ्यास करायचा हे निश्चित ठरवून योगाभ्यास करावा. साधारणपणे रोज एक ते दीड तास योगासनांची साधना पुरेशी आहे. योगासने करण्याचे शारिरीक संपूर्ण फायदे हवे असल्यास योगाभ्यास करताना सातत्य हवं शिवाय वेळेचे बंधन हि आवश्यक आहे.

योगासन करण्याची जागा

योगाभ्यासाच्या जागे संदर्भात ग्रंथां मधील उल्लेखा प्रमाणे लोकवस्ती पासून दूर रानात किंवा डोंगरावर योगाभ्यास करावा. पण सद्य काळा नुसार आपल्या सोइ नुसार जागा निवडावी. एरवी कोणताही अभ्यास करताना आपण अशी जागा निवडतो जेथे कोणत्याही प्रकारे अभ्यासात व्यत्यय येणार नाही त्याच प्रमाणे योगाभ्यासासाठी सुयोग्य जागा निवडावी. सर्वसाधारणपणे योगाभ्यास करताना मंद पण पुरेसा उजेड असलेली, संथपणे हवा खेळती असलेली, आवाजाचे प्रदूषण नसलेली, माणसांची ये जा नसेल अश्या ठिकाणी शिवाय योगासने विना अडथळा करण्या इतकी मोठी जागा अवश्य आसते. एकदा जागा निश्चित केल्यावर रोज त्याच जागेवर योगासने करावीत. जागा बदलू नये.

योगासन करण्यासाठी आसन

सर्वात पहिला नियम म्हणजे योगाभ्यास जमिनीवर किंवा फरशीवर बसून करू नये. ग्रंथान मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे योगाभ्यास करताना जमिनीवर मृगजीन अंथरून त्यावर योगाभ्यास करावा. परंतु आधुनिक काळात मृगजीन बाळगणे गुन्हा आहे. अश्यावेळी सतरंजी किंवा घोंगडी अंथरून त्यावर योगाभ्यास करावा. या आधुनिक काळात योगाभ्यासासाठी रबर किंवा फोम सारख्या विशिष्ठ पदार्थाचे योगा मॅट बाजारात उपलब्द आहेत. त्याचा वापर केला तरी चालेल.

योगासन करतानाचा पोषाख

योगाभ्यासासाठीचा पेहराव हा थोडा सैलसर व हालचाली करण्यासाठी सोयीचा असणे आवश्यक आहे. आधुनिक काळात स्त्री – पुरुष दोघांसाठी ट्रॅक पॅन्ट व टी शर्ट उत्तम.

वरील सर्व गोष्टी पाळून योगासनांचा अभ्यास करताना मनाची एकाग्रता असायला हवी, नियंत्रित श्वास व हाता पायाची हालचाल करताना योग्य ठीकाणी श्वास घेणे व सोडणे या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक केल्यास योगाभ्यासाचे सकारात्मक परिणाम लवकर दिसून येतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in