काळ्या मिरीचे पाणी प्या आणि 'या' समस्यांपासून दूर रहा

त्वचा अधिक चांगली बनविण्यास मदत मिळते आणि रक्तातील साखरेची पातळीदेखील नियंत्रणात आणता येते.
काळ्या मिरीचे पाणी प्या आणि 'या' समस्यांपासून दूर रहा

काळी मिरी हा एक खड्या मसाल्यातील प्रकार आहे. चवीला तिखट पण आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असा हा पदार्थ आहे. काळीमिरी सहजपणे स्वयंपाक घरात उपलब्ध होत असते. यात असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी घटक हे त्वचा आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते. यासाठी नियमित काळ्या मिरीचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा अधिक चांगली बनविण्यास मदत मिळते आणि रक्तातील साखरेची पातळीदेखील नियंत्रणात आणता येते. चला तर जाणून घेऊयात काळ्या मिरीच्या पाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

त्वचा – काळ्या मिरीचे पाणी नियमित प्यायल्याने त्वचेस नैसर्गिक चमक मिळते. कारण काळ्या मिरीचे पाणी आपल्या त्वचेवर सकारात्मक परिणाम करते. वास्तविक काळ्या मिरीत अँटिऑक्सिडंट्स आढळतात. जे फ्री रॅडिकल्स डॅमेजच्या प्रभावाला रिव्हर्स करतात. हे फ्री रॅडिकल्स त्वचेच्या सेल्सला हानी पोहचवतात. परिणामी त्वचा अधिक खराब दिसते. यासाठी काळ्या मिरीचे पाणी नियमित प्यायल्याने येणाऱ्या सुरकुत्या त्वचेवर लवकर दिसत नाहीत आणि त्वचा अधिक चिरतरूण दिसते.

स्मरणशक्ती- काळ्या मिरीचे पाणी आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यातील काही घटक आपल्या मेंदूला डिजनरेट होण्यापासून वाचवतात. त्यामुळे मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करतो आणि स्मरणशक्तीही चांगली राहते. शिवाय ज्या व्यक्तींना पार्किन्सन्स आणि अल्जाईमरसारख्या आजारांची आनुवंशिकता आहे, त्यांच्यासाठी हा उपाय उत्तम आहे. इतकेच काय तर, शरीरातील साखर नियंत्रणात आणण्यासाठीसुद्धा काळ्या मिरीच्या पाण्याचा फायदा होतो.

हृदय- काळ्या मिरीच्या पाण्याचे सेवन केल्यास हृदयावर याचा चांगला प्रभाव पडतो. कारण काळ्या मिरीतील पोषक तत्व वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हृदय सुरक्षित राहते व चांगल्या तऱ्हेने काम करते. त्यामुळे आठवड्यातून २-३ वेळा काळ्या मिरीच्या पाण्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in