दररोज प्या काश्मिरी 'कावा' चहा, शरीरासाठी आहे भरपुर फायदेशिर, पाहा सोपी रेसिपी

पण कावा चहा म्हणजे नेमके काय? आणि त्याचे फायदे कोणते याविषयी जाणून घेऊया अधिक माहिती
दररोज प्या काश्मिरी 'कावा' चहा, शरीरासाठी आहे भरपुर फायदेशिर, पाहा सोपी रेसिपी

चांगल्या आरोग्यासाठी हल्ली अनेक जण ग्रीन टी, ब्लॅक कॉफी पितात. पण आम्ही तुम्हाला अश्याच आरोग्यदायी चहाचा एका प्रकाराबद्दल सांगणार आहोत. हा चहा काश्मिरी लोकांच्या आहारातील एक पेय आहे. कडाक्याच्या थंडीत पिला जाणारा कावा हा मसालायुक्त चहा आरोग्यासाठी फारच फायद्याचा आहे असे सांगितले जाते. हा एक डिटॉक्स करणारा चहा असून त्याच्या रोजच्या सेवनाने तुमच्या मसाला चाय सेवनाची सवय कमी होऊ शकते. इतकेच नाही तर या निरोगी सवयीमुळे तुमचे वजनही नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. पण कावा चहा म्हणजे नेमके काय? आणि त्याचे फायदे कोणते याविषयी जाणून घेऊया अधिक माहिती

हा कावा चहा भारतातील काश्मिर, अफगाणिस्तान, इराण आणि मध्य आशियाच्या काही भागात प्यायला जातो. कावा या शब्दाचा अर्थ कश्मिरमध्ये गोड चहा होतो. सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी गरम मसाल्याचे उत्पादन घेतले जाते अशा ठिकाणी कावा चहा बनवला जातो. कावा चहामध्ये प्रामुख्याने दालचिनी, वेलची आणि केशर याचा समावेश केला जातो. त्यामुळेच हा चहा खूपच हेल्दी आणि फ्लेवरफुल लागतो. या चहाची चव ही फारशी रोजच्या चहासारखी नसली तरी देखील पोटाच्या आरोग्यासाठी हा चहा फारच लाभदायक असा आहे.

कावा चहा पिण्याचे फायदे आणि तोटे

  • पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी कावा चहा हा खूपच फायद्याचा आहे. तुम्हाला पोटाचे काही विकार असतील तर तुम्ही कावा चहा प्यायला हवा.

  • फॅच बर्न करण्यासाठी देखील हा कावा चहा फायद्याचा आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे अशांनी तर कावा चहा अगदी रोज प्यायला हवा.

  • कावा चहामध्ये विटामिन B असते. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत मिळते. त्यामुळे हा चहा आजारांना दूर ठेवण्यास मदत करतो.

  • जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर अशावेळी कावा चहा प्यावा. त्यामुळे सर्दी बरी होण्यास मदत मिळते.

  • कावा चहा प्यायल्यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत मिळते. मरगळ जाऊन हा चहा तरतरीत ठेवतो. त्यामुळे याचे सेवन चांगले असते.

  • कावा चहा बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी पाणी उकळून त्यामध्ये केशराच्या काड्या, वेलची, दालचिनी घालून चांगली उकळून घ्यावी. चहा गाळून तो गरम गरम सर्व्ह करा.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in