जास्त वजनामुळे टाईप २ डायबिटीज, हार्ट डिसीज सारखे आजार होतात. हर्बल ड्रिंक्स वजन कमी करण्यात फार मदत करतात. व्यायामासोबतच रोज सकाळी रिकाम्या पोटी या हर्बल ड्रिंक्सचे सेवन केल्यास निश्चितच एका महिन्याच्या आत स्लिम होऊ शकता. या हर्बल ड्रिंकबद्दल जाणून घेऊया.
टीओआयच्या बातमीनुसार, वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या पाण्याने दिवसाची सुरुवात करा. मेथीचे पाणी बनवण्यासाठी मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी गाळून प्या. दुसरा उपाय म्हणजे सकाळी मेथी पाण्यात उकळून घ्या आणि थंड झाल्यावर प्या.
जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात, जे प्यायल्यानंतर दिवसभर भूक लागत नाही. तसेच जिरे-पाणी शरीर आणि मन दोन्ही दिवसभर ताजेतवाने ठेवते. इतरही फायदे होतात.
वजन कमी करण्यासाठी सकाळी लवकर रिकाम्या पोटी आले-पाणी सेवन करा. आले अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. आल्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म दिवसभर पोटाला आराम देतात.
वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर पाणी उकळून त्यात थोडी हळद आणि काळी मिरी पावडर टाका. त्यानंतर ते गाळून चहाप्रमाणे सेवन करा. महिन्याभरात शरीर बारीक होऊ लागेल.
तुळशीत अनेक औषधी गुणधर्म आहेत. तुळशीच्या पाण्यात मौल्यवान अँटिऑक्सिडंट्स आढळतात. तुळशीचे पाणी चहासारखे बनवा आणि सकाळी चहा ऐवजी तुळशीचे पाणी घ्या. वजनासह अनेक समस्यांपासून सुटका मिळेल.