कच्च्या हळदीचा चहा प्यायल्याने होतात 'हे' फायदे

कच्च्या हळदीच्या चहा आरोग्यासाठी भरपुर फायदेशीर ठरतो.
कच्च्या हळदीचा चहा प्यायल्याने होतात 'हे' फायदे
Published on

काहीजण दिवसाची सुरुवात सकाळी एक चमचा तूप व कोमट पाणी पित करतात. तर, काहीजण मेथीचे, धण्याचे, जिऱ्याचे, ओव्याचे, तुळशीचे पाणी पिऊन दिवस सुरु करतात. याउलट फक्त चहा किंवा कॉफी पिणाऱ्यांची संख्या ही खूपच मोठी आहे. तर आज आपण एक असाच आयुर्वेदिक चहाबद्दल जाणुन घेणार आहोत. जो आरोग्यासाठी भरपुर फायदेशीर ठरतो आणि हा चहा त्वचेसंबंधी आजारांवर ही फायदेशिर आहे.

कच्च्या हळदीच्या चहाचे फायदे

कच्च्या हळदीमध्ये मुख्यतः कर्क्यूमिन हा प्रमुख घटक असतो. सकाळच्यावेळी जर तुम्ही कच्च्या हळदीच्या चहाचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात होणारी जळजळ कमी करू शकता. सांधेदुखीचा सामना करणाऱ्या व्यक्तींसाठी हे फायदेशीर ठरू शकते. याव्यतिरिक्त, क्युरक्यूमिनचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील मुक्त रॅडिकल्सवर प्रभावी असतात. ज्यामुळे पेशींचे नुकसान टाळण्यास मदत मिळू शकते. कच्च्या हळदीचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुण असतात. कर्क्युमिनमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असू शकतात असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.

चहा कसा बनवायचा?

साहित्य- पाणी, कच्ची हळद, गरज असल्यास गूळ

कृती-

  • थोडे पाणी उकळून घ्या.

  • उकळल्यावर गॅस बंद करा.

  • थोडी कच्ची हळद किसून घ्या. उकळी काढा

  • गाळून घ्या.

कच्च्या हळदीमध्ये कर्क्युमिन हे दाहक विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असलेले सत्व असते. कच्ची हळद जळजळ कमी करण्यास, प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करू शकते. काही अभ्यासांनुसार, यात कर्करोगविरोधी गुणधर्म असू शकतात. तुम्हाला तुमचा चहा गोड आवडत असल्यास तुम्ही गूळ किंवा खोबऱ्याची पावडर घालू शकता.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in