उन्हाळा सुरू होताच फ्रिजचं पाणी पिताय? मग 'हे' वाचाचं

फ्रिजचं पाणी पिणं म्हणजे आजारपणाला आमंत्रणच असतं. यासाठी जाणून घ्या उन्हाळ्यात थंड पाणी पिणं का टाळावं.
उन्हाळा सुरू होताच फ्रिजचं पाणी पिताय? मग 'हे' वाचाचं
Published on

उन्हाळा सुरू होताच अंगातून घामाचा धारा आणि उन्हाने अंगाची लाही-लाही व्हायला सुरूवात होते. अशा वेळी उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी आणि शरीराला थंडावा मिळण्यासाठी अनेक लोक फ्रिजचं, बर्फाचं गार पाणी प्यायला सुरूवात करतात. थंडगार पाणी पिल्यानंतर काही सेंकद बरं वाटतं. मात्र फ्रिजचं पाणी शरीरासाठी मुळीच चांगलं नसतं. त्यापेक्षा माठातील थंड पाणी पिणं फायदेशीर ठरतं. फ्रिजचं पाणी पिणं म्हणजे आजारपणाला आमंत्रणच असतं. यासाठी जाणून घ्या थंड पाणी पिणं आरोग्यासाठी का हिताचं नाही. 

पचनशक्ती

थंड पाणी प्यायल्याने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. थंड पाण्यामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो. थंड पाण्याने चेहरा धुता असाल तर तुमची त्वचा ताणली जाते आणि हेच थंड पाणी जेव्हा तुम्ही पिता तेव्हा तुमच्या नाजूक आतड्यांवर ही मोठा परिणाम होतो. 

बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो आणि बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. मात्र याला थंड पाणी पिण्याची सवयदेखील कारणीभूत असते. कारण थंड पाणी पिण्यामुळे आतड्यांमध्ये अन्न न पचता अडकून राहतं. ज्यामुळे बद्धकोष्ठता होते.

ह्रदयाचे ठोके मंद होतात

शारीरिक कार्य सुरळीत राहण्यासाठी ह्रदयाचे कार्य सुरळीत राहणं गरजेचं आहे. मात्र जर तुम्ही वारंवार थंड पाणी पित असाल तर तुमच्या शरीरातील तापमानात बदल होतो. ज्यामुळे तुमच्या ह्रदयाचे ठोके कमी होतात.

डोकेदुखी जाणवते

उन्हाळ्यात जर तुम्हाला सतत डोके दुखण्याचा त्रास होत असेल. तर यामागे तुमचं थंड पाणी पिणं कारणीभूत असू शकतं. बर्फ अथवा थंड पाणी गळ्यातून खाली जाताना त्याचा परिणाम तुमच्या डोक्यावर होतो. कारण बर्फ अथवा पाण्याचा थंडावा तुमच्या नसांवर परिणाम करतात. ज्यामुळे मेंदूला चुकीचा संदेश मिळतो आणि डोकेदुखी जाणवते.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in