दररोज खा एक चमचा तूप, शरीराला होतात ‘हे’ फायदे

आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तूपाचं सेवन लाभदायक ठरतं तसेच शरीराला नक्कीच याचे अनेक फायदे होतात.
दररोज खा एक चमचा तूप, शरीराला होतात ‘हे’ फायदे

दररोज एक चमचा तूप खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात, आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तूपाचं सेवन लाभदायक ठरतं तसेच शरीराला नक्कीच याचे अनेक फायदे होतात. आयुर्वेदानुसार तूप किंवा लोणी खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, त्वचेसाठी आणि पोटासाठी तूप खाणे खूप फायदेशीर ठरते. तूपाच्या सेवणाने हाडे मजबूत होऊ शकतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते. मात्र, जास्त प्रमाणात तूप खाल्ल्याने शरीराला गंभीर हानी होऊ शकते, त्यामुळे तूप खाण्याचे प्रमाण आणि फायदे यासंदर्भात आपण आज जाणून घेऊयात.

तूपात हेल्दी फॅट्स असतात आणि ते फॅटी ऍसिडचे खूप चांगल स्रोत आहे. तूपात जीवनसत्त्वे ए, ई आणि डी भरपूर प्रमाणात असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात, शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता तूप खाल्ल्याने भरून निघते, तसेच त्वचा चमकदार आणि निरोगीही बनते. जर तुम्ही रोज एक चमचा तूप खाल्ले तर तुम्हाला सांधेदुखीपासून आराम मिळेल आणि हाडे मजबूत होतील. याशिवाय आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तसेच तूप खाल्ल्याने मुलांची स्मरणशक्ती सुधारते. याशिवाय दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

किती तूप खावे

तूप मर्यादित प्रमाणातच खावे कारण ते शरीरासाठी फायदेशीर असेल तर त्याचे तोटेही आहेत. विशेषत: 40 वर्षांवरील लोकांनी मर्यादित प्रमाणात तूप खावे.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in