हिवाळ्याच्या दिवसांमध्ये एकतरी 'अक्रोड' खा! पाहा अक्रोड खाण्याचे काय होतात फायदे ?

हिवाळ्यातही तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवायची असेल, तर रोज अक्रोड खा, यामुळे संपूर्ण हिवाळ्यात तुमची त्वचा सुंदर राहते.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये एकतरी 'अक्रोड' खा! पाहा अक्रोड खाण्याचे काय होतात फायदे ?

चमकणारी त्वचा

हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडते आणि त्वचेला खाज येते. जर तुम्हाला हिवाळ्यातही तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार ठेवायची असेल, तर रोज अक्रोड खा, यामुळे संपूर्ण हिवाळ्यात तुमची त्वचा सुंदर राहते.

हाडांची मजबूती

हिवाळ्यात हाडांशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात असतात या समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी सुक्यामेव्यामधील आक्रोड दररोज खावे. अक्रोडमध्ये असणारं अल्फा-लिनोलेनिक ऍसिड जे तुमच्या कमकुवत हाडांना ताकद देण्याचे काम करेल आणि जर तुमची हाडे कमकुवत असतील, त्यामध्ये नेहमीच वेदना होत असतील तर रोज अक्रोड खाल्ले तर तुमची हाडे आणि दात मजबूत होतात.

विसरण्याची सवय

अक्रोडमधील व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक तत्व असतात. जे मेंदू आणि शरीर दोन्हीसाठी खूप फायद्याचे ठरतात. अक्रोड खाल्ल्याने मेंदूपर्यंत रक्त पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक घटक सहज पोहोचतात त्यामुळे विसरण्याची सवय कमी होतो.

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी बरेच मार्ग तुम्ही अवलंबले असणार पण शरीराचे वाढते वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर रोज एक अक्रोड खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते. अक्रोडमध्ये निरोगी प्रथिने, चरबी, फायबर आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे खाल्ल्यानंतर भूक कमी होते. आणि दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. याशिवाय त्यात कॅलरीज कमी असतात ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in