उत्तम आरोग्यासाठी कढीपत्ता खा! शरीरातील बरेचसे आजार होतात नष्ट

केसांना काळे आणि घनदाट बनवायचे असतील तर नारळाच्या तेलात कढीपत्ताचे पाने टाकून ते उकळून घ्या व केसांना लावून चांगल्या प्रकारे मॉलिश करा .
उत्तम आरोग्यासाठी कढीपत्ता खा! शरीरातील बरेचसे आजार होतात नष्ट

कढीपत्ता दररोज सेवन केल्याने अनेक फायदे होतात. कढीपत्ता आरोग्यासाठी खूप चांगला असतो. शरीरातील बरेचसे आजार कढीपत्ता खाल्ल्याने जातात.

  • कढीपत्ता सेवनाने केस मजबूत बनतात - दररोज कढीपत्ता सेवनाने केस मजबूत बनतात तसेच, केस गळणे देखील कमी होते. कारण कढीपत्ता सेवनाने विटामिन, फॉस्फोरस आणि आयरन सोबत मुबलक प्रमाणात पोषक तत्वे मिळतात. जे केसांना आतून पोषण देतात व मजबूत बनवतात . केसांना काळे आणि घनदाट बनवायचे असतील तर नारळाच्या तेलात कढीपत्ताचे पाने टाकून ते उकळून घ्या व केसांना लावून चांगल्या प्रकारे मॉलिश करा

  • शरीरात रक्ताची कमतरता दूर करते- आयरन आणि फॉलिक एसिडचे एक चांगले स्त्रोत आहे. कढीपत्ता अ‍ॅनिमिया सारख्या समस्यांपासून वाचवते . अ‍ॅनिमिया म्हणजे रक्ताची कमी होय. म्हणून रिकाम्या पोटी कढीपत्ता सेवनाने नक्कीच लाभ होतो.

  • पचन क्रियेमध्ये सहाय्यक कढीपत्ता - पचन संबंधी समस्या असेल किंवा दस्त लागल्यावर कढीपत्त्याला वाटून ताकात घेतल्याने आराम मिळतो. हा पोटातील गडबडीला शांत करतो आणि पोटा संबंधी सर्व समस्यांचे निवारण करतो.

  • मधुमेहासाठी फायदेशीर - मधुमेहाचे रुग्ण असल्यास दररोज जेवणात कढीपत्ताचे सेवन केल्याने तुम्ही या समस्येपासून नक्कीच मुक्त होऊ शकतात रक्तातील साखरेची पातळीला नियंत्रित करण्यासाठी कढीपत्त्याचे सेवन आरोग्यदाई आहे .

  • कफ आणि सर्दी- सर्दी कफ झाल्यानंतर कफ छातीत जमा होतो व तो घट्ट होतो, तर यापासून आराम मिळण्यासाठी कढीपत्ता कारागार सिद्ध होतो.

  • त्वचारोगासाठी आरोग्यदायी - त्वचा रोग संबंधी समस्यांवर कढीपत्ता फायदेशीर असतो.अंगावर पुरळ येत असतील किंवा काही अन्य त्वचेच्या समस्या असतील तर दररोज कढीपत्ताचे सेवन करावे व त्याची पेस्ट बनवून लावावे.

  • रोज प्रतिकारक शक्तीला बळकट करते - कढीपत्ता अँटीऑक्ससिडेन्ट असल्याने त्यात असलेली अँटीऑक्ससिडेन्ट ऑक्सीडेटिव तणावला कमी करते आणि रोगाशी लढायला मदत करते.

  • डोळ्यांसाठी उपयोगी- कढीपत्त्यात असलेले विटामिन ए हे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी मदत करते जेवणानंतर कढीपत्त्याचे सेवन केले पाहिजे. तसेच सकाळी रिकाम्यापोटी मधासोबत पण खाऊ शकतात.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in