
पेरू या फळाचे आरोग्याला असंख्य आश्चर्यकारक फायदे आहेत, पेरू कॅल्शियमने समृद्ध आहे. पेरूच्या प्रत्येक १०० ग्रॅममध्ये १८ ग्रॅम खनिजे असतात. यामध्ये केळीपेक्षा अधिक पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करू शकतात. रोेज पेरु खाल्याने आपल्या आरोग्याला कसा फायदा होतो ते पाहूयात.
गर्भधारणेदरम्यान फायदेशीर
या फळामध्ये २१% व्हिटॅमिन A असते, जे तुमच्या त्वचेला उजवळते. यामध्ये २०% फोलेट आणि व्हिटॅमिन B-9 देखील असते, जे गर्भातील बालकाच्या मज्जासंस्थेच्या विकासास मदत करते आणि न्युरल ट्यूबच्या नुकसानीपासून बचाव करते. त्यामुळे, हे गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे.
रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत
पेरू व्हिटॅमिन C ने समृद्ध असते. यामध्ये संत्र्यापेक्षा चार पट जास्त व्हिटॅमिन C असते. व्हिटॅमिन C रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करते आणि चांगली दृष्टी राखण्यास मदत करते. तसेच. सर्दी आणि इतर कोणत्याही विषाणूजन्य संसर्गापासून पेरु बचाव करते.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत
पेरूमध्ये अननसाच्या तुलनेत चार पट अधिक तंतू असतात, जे रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात.
कर्करोगाच्या धोका कमी
पिंक रंगाच्या पेरूमध्ये असलेले लाइकोपीन UV किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. तसेच, हे प्रोस्टेट आणि स्तन कर्करोगापासून बचाव करते.
तुमच्या हृदयास निरोगी ठेवते
पेरू नको असलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते. त्यामुळे ते हृदयाच्या विकारांना फायदेशीर आहे.
दृष्टी सुधारण्यात मदत करते
पेरू मध्ये व्हिटॅमिन A असते, जे की चांगली दृष्टी राखण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच, यामुळे मोतीबिंदू होण्यापासून प्रतिबंध होतो.