एक चमचा शुद्ध मध खा, पोटाच्या समस्यांपासून रहा दूर

दिवसातून कमीत कमी एकदा मधाचे सेवन केल्याने पोटाच्या समस्यापासून दूर राहण्यास मदत होते.
एक चमचा शुद्ध मध खा, पोटाच्या समस्यांपासून रहा दूर

अनेकांना जेवण जर जास्त प्रमाणात झाले तर पोटाच्या समस्या जाणवतात. गॅस होणे , अपचन अश्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर जेवणानंतर एक चमचा शुद्ध मध खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. मध शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. लहान मुलांनाच्या आरोग्यासाठी देखील मध गुणकारी ठरतो. त्यामुळे मधाचे सेवन करणे शरीरासाठी नेहमी फायद्याचे ठरते. मध हा अँटिऑक्सिडंट असलेला घटक आहे. त्यामध्ये असलेल्या घटकांमुळे पोट फुगणे, गॅस निर्माण होणे या समस्या जास्त प्रमाणात जाणवत नाहीत. त्यामुळे दिवसातून कमीत कमी एकदा मधाचे सेवन केल्याने पोटाच्या समस्यापासून दूर राहण्यास मदत होते.

एक चमचा मध (21 ग्रॅम) मध्ये अंदाजे 64 कॅलरीज असतात, 17 ग्रॅम साखर असते, ज्यामध्ये फ्रक्टोज, ग्लुकोज, माल्टोज आणि सुक्रोज देखील असतात. मधामध्ये चरबी वाढवणारे फायबर, फॅट किंवा प्रोटीन असते. त्यात काही प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात जी शरीराला पोषण देतात.

मधाची वैशिष्ट्ये

  1. मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक असतात, जे कोणत्याही प्रकारची दुखापत लवकर भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरतात.

  2. हे औषधात सुमारे 5000 वर्षांपासून वापरले जात आहे.

  3. आहारात साखरेऐवजी मधाचा समावेश करू शकता. ते त्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे तुमचे जेवण आरोग्यासोबतच चवदार बनते.

  4. त्वचेच्यासंबंधीत आरोग्यासाठी ठरते फायदेशिर

    Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in