व्यायामानंतरची भूक शमविण्यासाठी खा 'हे' पौष्टिक पदार्थ

व्यायामानंतरची भूक शमविण्यासाठी खा 'हे' पौष्टिक पदार्थ

व्यायामामुळे लागलेली भूक घालवण्यासाठी आणि वजन नियंत्रित करण्यासाठी पौष्टिक अन्नपदार्थ खाणे ।ठरते शरीरासाठी उत्तम
Published on

फळं- सकाळी उठल्यावर अंथरुणातच चहा, कॉफी पिण्याच्या जीवघेण्या सवयींपेक्षा फळं खाणं केव्हाही चांगल असतं. फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखरेचा समावेश असतो. यामुळे फळांमधील साखर आरोग्याला हानी पोहचवत नाही. शिवाय फळांमधील इतर गुणधर्म शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. फळांमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे प्रमाण फार मोठ्या मात्रेत असते. यामुळे फळे आरोग्यासाठी अतिशय चांगली. तसेच जर व्यायामानंतर लागलेली भूक शमवायची आणि वजन वाढून द्यायचे नसेल तर तुम्हाला आवडणारी फळे खा.

सुकामेवा – काजू, खजूर, अंजीर, बदाम. यामध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी फॅटस असतात. जे शरीरासाठी लाभदायक असतात. आपले शरीर मजबूत बनवण्यासाठी हेल्दी फॅट्स आवश्यक आहेत. व्यायामामुळे शरीराची बरीच ऊर्जा खर्ची होते. हि पुन्हा मिळवण्यासाठी सुकामेवा खाणं नेहमी योग्य.

स्प्राऊट्स (मोड आलेली कडधान्ये) – मोड आणलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अन्य कोटण्याही भाज्यांपेक्षा जास्त प्रमाणात असते. कारण कडधान्यांना मोड आणल्यावर ते पचायला हलके होतात. दरम्यान शरीराला उर्जेसह प्रोटीन्सचीदेखील आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते. म्हणूनच दिवसातील पहिले खाणे अर्थात व्यायामानंतर केला जाणारा नाश्ता हा प्रोटीन्सयुक्त असावा.

ओटस – वजन कमी करण्यासाठी खाल्ले जाणारे ओटस अतिशय पोषणदायी आहार आहे. ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. व्यायामामुळे लागलेली भूक घालवण्यासाठी आणि वजन नियंत्रित करण्यासाठी ओटस खाणे कधीही उत्तम. ओटसमुळे बराच काळ भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. मुख्य म्हणजे व्यायामानंतर भूक लागली तर ओटसमध्ये फळे, ड्रायफ्रूटस, दूध, मध असे पोषणदायी पदार्थ मिसळा आणि खा. यामुळे शारीरिक ऊर्जा वाढते आणि इम्युनिटी मजबूत होते.

logo
marathi.freepressjournal.in