नूडल्स खाणे योग्य की अयोग्य? वाचा सविस्तर...

नूडल्स बऱ्याच लोकांचा आवडता पदार्थ आहे. नूडल्स फक्त २ मिनिटांत तयार होतात आणि काही लोक नियमितपणे खातात. नूडल्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.
नूडल्स खाणे योग्य की अयोग्य? वाचा सविस्तर...
फोेटो सौ FPJ
Published on

नूडल्स बऱ्याच लोकांचा आवडता पदार्थ आहे. नूडल्स फक्त २ मिनिटांत तयार होतात आणि काही लोक नियमितपणे खातात. नूडल्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. आपल्या आजूबाजूला असलेल्या चायनीज फूडच्या गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये देखिल नूडल्स मिळतात. नूडल्स पिठाचे बनलेले असतात हे खरं आहे पण नूडल्स बनवताना त्यामध्ये अनेक प्रकाराचे हानिकारक घटक वापरुन चव आणली जाते त्यामुळे ते रोज किंवा सतत खाणे आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे नूडल्स खाणे टाळणे केव्हाही चांगले.

का आहे नूडल्स खाणे धोकादायक

उच्च सोडियम
मॅगी किंवा नूडल्स जास्त काळ टिकण्यासाठी जास्त वेळ प्रिझर्व्ह करुन ठेवलेले असतात. नूडल्समध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तदाब वाढू शकतो. जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा त्याचा हृदयावर आणि इतर अवयवांवर परिणाम होते.

फोेटो सौ FPJ

नको असलेली चरबी
आपल्याला अन्नातून चरबी दोन प्रकारे मिळते, एक चांगली चरबी आणि वाईट चरबी. नूडल्समध्ये वाईट फॅट्स जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार होऊ शकतो. तसेच नूडल्स खाल्यामुळे रक्तातील साखर वाढणे, वजन वाढणे, उच्च रक्तदाब यासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत. नूडल्सची चव वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. जास्त प्रक्रिया केलेले अन्न आरोग्यासाठी चांगले नसतात त्यामुळे नुकसान होते.

फोेटो सौ FPJ

पोषक तत्वांची कमतरता
नूडल्समध्ये शरीराला आवश्यक असलेले कोणतेही विशेष घटक नसतात. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते.पण प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे खूप कमी असतात. तसेच नूडल्सची चव वाढवण्यासाठी वापरण्यात येणारे सॉस, केचप इत्यादीही जास्त हानिकारक असतात.

फोेटो सौ FPJ

फळे, भाज्या, दूध, कडधान्ये, धान्ये यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा आणि आरोग्याची काळजी घ्यावी.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)

logo
marathi.freepressjournal.in