भिजवलेले चणे-शेंगदाणे एकत्र खाल्ल्यास होतात शरीराला बहूसंख्य फायदे

भिजवलेले कडधान्य रोज खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात, त्यातच जर भिजवलेले चणे आणि शेंगदाणे खाल्ले तर शरीराला त्याचा अधिक फायदा होतो.
भिजवलेले चणे-शेंगदाणे एकत्र खाल्ल्यास होतात शरीराला बहूसंख्य फायदे

भिजवलेले कडधान्य रोज खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात, त्यातच जर भिजवलेले चणे आणि शेंगदाणे खाल्ले तर शरीराला त्याचा अधिक फायदा होतो. या दोन्ही पौष्टिक पदार्थामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. चणे, शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हरभऱ्यामध्ये प्रथिने, फायबर, लोह, चरबी आणि कॅलरीज असतात. तर शेंगदाणे ओमेगा 6, कॅल्शियम आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत मानला जातात. सकाळी रिकाम्या पोटी हरभरा आणि शेंगदाणे खाणे सर्वात फायदेशीर आहे. चणे- शेंगदाने शरीरातल्या कोणकोणत्या समस्या दूर करतात पाहूया.

कसे खावेत हरभरे आणि शेंगदाणे-

हरभरे आणि शेंगदाणे नीट धुवून खावे. रात्री भिजवून दुसर्‍या दिवशी पाण्यातून काढून देखील याचे सेवन करता येते. याशिवाय ते वाटून खाऊ शकतात. तसेच रात्रभर हरबरा- शेंगदाणे भिजवल्यानंतर सकाळी गाळून स्वच्छ करा. आता टोमॅटो, कांदा, गाजर आणि बीटरूट यांसारख्या गोष्टी चिरून घ्या आणि मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात थोडेसे काळे मीठही टाकू शकता. सकाळी न्याहारी करताना याचे नियमित सेवन करता येते.

अशक्तपणा दूर होतो

अशक्तपणा दूर करण्यासाठी चणे-शेंगदाणे खाणं अत्यंत फायदेशिर असतं, ॲनिमियाच्या रुग्णांना सकाळी रिकाम्या पोटी हरभरे आणि शेंगदाणे खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. कारण हरभरा आणि शेंगदाण्यात लोहाचे प्रमाण जास्त असते. लोह शरीरात रक्त तयार करण्यास मदत करते.

रक्तदाब नियंत्रित राहते

हरभरा आणि शेंगदाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी हरभरे आणि शेंगदाणे खाणे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

वजन कमी करण्यास मदत करते

वजन कमी करण्यासाठी हरभरा आणि शेंगदाणे सकाळी रिकाम्या पोटी खावेत, यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने प्रथिने वजन कमी करण्यास मदत करतात. हरभरा आणि शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते, ज्यामुळे भूक कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

पाचक प्रणाली मजबूत राहते

बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅससारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी भिजवलेले हरभरा आणि शेंगदाणे खावे. हे दोन्ही फायबरचे चांगले स्रोत आहेत. फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.

प्रतिकारशक्ती मजबूत करते

हरभरा आणि शेंगदाण्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. अँटिऑक्सिडंट्स शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी हरभरे आणि शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला संसर्गाशी लढण्याची क्षमता मिळते.

कोलेस्ट्रॉल कमी करते

हरभरा आणि शेंगदाण्यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी हरभरे आणि शेंगदाणे खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

logo
marathi.freepressjournal.in