बदाम खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे तर होतातच. लहानपणापासून मुलांना बदाम खायला दिले जातात. मेंदूला तीक्ष्ण ठेवण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत अनेक फायदे बदाम खाल्ल्याने होतात. पण हा बदाम शरीरासाठी जेवढा फायदेशीर मानला जातो, तेवढाच तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. जास्त बदाम खाण्याचे अनेक तोटे होतात, तर जाणून घेऊयात जास्त बदाम खाण्याचा शरीरावर होणारा परीणाम आणि रोज किती बदाम खायला हवेत.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही रोज ५ बदाम खायला हवे, ७-८ बदाम खाऊ नये. जास्त बदाम खाल्ल्याने आतडे कमजोर होऊ शकतात. आणि गॅस्ट्रिकच्या समस्यामुळे अपचनाचा त्रास ही होऊ शकतो. सकाळी नाश्ताआधी बदाम खायला हवे
पचन समस्या
जास्त बदाम खात असाल तर त्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यातील उच्च फायबरमुळे गॅस आणि पोट फुगणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
ऍलर्जी
तुम्ही जर जास्त बदाम खाल्ले तर त्यामुळे ऍलर्जी देखील होऊ शकते. बदामाच्या ऍलर्जीमुळे मळमळ, पुरळ, श्वास घेण्यास त्रास, उच्च रक्तदाब आणि सूज येऊ शकते.
मुतखडा
बदामामध्ये ऑक्सलेट आढळते ज्यामुळे ते जर तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ले तर ऑक्सलेटची पातळी वाढते. ज्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो. त्यामुळे बदाम मर्यादित प्रमाणातच खा.
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई
जास्त बदाम खाल्ल्याने व्हिटॅमिन ई ची विषबाधा देखील होऊ शकते. ज्यामुळे अतिसार, पोटात पेटके आणि इतर पाचन समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
वजन वाढणे
जास्त प्रमाणात जर बदाम खात असाल तर याने तुमचे वजन ही वाढू शकते. यात मोठ्या प्रमाणात कॅलरी असतात. ज्याने वजन वाढते.
पोषक तत्वांची कमतरता
बदामामध्ये फायटिक नावाचे ऍसिड असते. हे शरीरातील महत्त्वपूर्ण खनिजे आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यात अडथळा आणू शकते. अशा परिस्थितीत बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅल्शियम, लोह आणि झिंकसारख्या पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.
बदान कसे खावे
बदाम जर भिजवून खालले तर त्याचा दुप्पट फायदा होऊ शकतो. भिजवून खालले तर त्यामुळे ते पचनाचा सोपे असतात. रात्री पाण्यात भिजवून सकाळी तुम्ही ते खाऊ शकता.
Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.