पाठदुखीची समस्या जाणवतेय? 'हे' उपाय करून पाहा, लगेच मिळू शकतो आराम

आज प्रत्येकालाच आयुष्यात कामानिमित्त मोठी धावपळ करावी लागते. या धावपळीमुळे पाठीवर ताण पडून पाठदुखीची समस्या निर्माण होते. पाठदुखीच्या समस्या असेल तर चालणे, उठणे आणि बसणे अशा सर्वच शारीरिक हालचालीमंध्ये त्रास होतो. प्रत्येकाला पाठदुखीची समस्या वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते.
पाठदुखीची समस्या जाणवतेय? 'हे' उपाय करून पाहा, लगेच मिळू शकतो आराम
प्रातिनिधिक छायाचित्र - (FreePik)
Published on

आज प्रत्येकालाच आयुष्यात कामानिमित्त मोठी धावपळ करावी लागते. या धावपळीमुळे पाठीवर ताण पडून पाठदुखीची समस्या निर्माण होते. पाठदुखीच्या समस्या असेल तर चालणे, उठणे आणि बसणे अशा सर्वच शारीरिक हालचालीमंध्ये त्रास होतो. प्रत्येकाला पाठदुखीची समस्या वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाला उपचारही त्यांच्या कारणाप्रमाणेच घेणे आवश्यक आहे. मात्र, सर्वसामान्यपणे पाठदुखीची कारणे आपल्या जीवनशैलीशी निगडीत असतात. यामध्ये असंतुलित आहार, जेवणाच्या वेळा न पाळणे, नियमित व्यायाम न करणे खूर्चीवर बसण्याच्या चुकीच्या पद्धती. इत्यादी समस्यांमुळे जर तुम्हाला पाठदुखी होत असेल तर इथे काही उपाय दिले आहेत. ते करून पाहा या उपायांमुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.

हर्बल किंवा आयुर्वेदिक तेलाने केलेला मसाज

तुम्हालाज जर तुमच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि बसण्याच्या किंवा चालण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे पाठदुखीचा त्रास होत असेल तर त्यावर मसाज हा उत्तम उपाय आहे. मसाज करण्यासाठी घरातील मोहोरी किंवा खोबऱ्याचे तेल फायदेशीर ठरते. मोहोरीचे तेल तर खूपच उत्तम असते. मसाज करण्यासाठी थोडेसे तेल हलकेच गरम करून घ्यावे आणि नंतर पाठीला मसाज करावा. तुम्ही घरच्या घरी मसाज केला तरी उत्तम असतो किंवा प्रोफेशनल मसाज करणाऱ्यांकडून मसाज करून घ्यावा. मसाज केल्याने उत्तम रक्ताभिसण होते. त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ केल्याने पाठदुखीचा त्रास कमी होतो.

मार्केटमधील हर्बल तेल वापरावे की नाही?

सामान्यपणे मसाजसाठी मार्केटमध्ये हल्ली अनेक मसाज तेल उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या वनस्पतींद्वारे हे तेल बनवले गेल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, असे तेल वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

एप्सम मीठ (Epsom Salt) किंवा मॅग्नेशियम सल्फेट

एप्सम मीठ हे देखील पाठदुखीत आराम देणारा एक उत्तम पर्याय आहे. तसेच फक्त पाठदुखीच नाही तर अंगावरील सूज कमी होण्यासही हे मदत करते. लक्षात घ्या एप्सम मीठ हे सैंधव मीठ नाही. सैंधव मीठ आणि एप्सम मीठ या दोन्हींच्या मूलभूत रासायनिक रचनेत मोठा फरक आहे. एप्सम मीठ ज्याला मॅग्नेशियम सल्फेट असेही म्हटले जाते. हे प्रामुख्याने आंघोळीच्या पाण्यात घालून ते पाणी पाठीवर घेऊन त्याने पाठ शेकून काढल्यास त्याचा फायदा होतो. हे मीठ तुम्हाला ऑनलाइन मागवता येते.

दुधात हळद टाकून पिणे

सूज येणे किंवा अंगदुखी यामध्ये आयुर्वेद शास्त्रानुसार हळद ही अत्यंत गुणकारी मानली गेली आहे. हळदीचे अनेक औषधी उपयोग आहेत. पाठदुखीच्या किंवा अंगदुखीच्या समस्येत एक ग्लास दुधात पाव चमचा हळद घालून पिल्यास त्याचा निश्चितच आराम होतो.

logo
marathi.freepressjournal.in